IND vs WI: भारत-वेस्टइंडीज पहिला कसोटी सामना मोफत कधी, कुठे पाहता येईल? जाणून घ्या सविस्तर

आशिया कप स्पर्धा आता संपली आहे. पण ट्रॉफीवरून अजूनही वाद सुरू आहे. आता टीम इंडियासमोर पुढची मोठी परीक्षा वेस्ट इंडिजविरुद्धची आहे. 2 ऑक्टोबरपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे (IND vs WI). पहिला कसोटी सामना गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. या स्पर्धेच्या पॉइंट्स टेबलमध्ये भारत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे.

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात भारतात आतापर्यंत 47 कसोटी सामने झाले आहेत. त्यात टीम इंडिया 13 वेळा जिंकली आहे, तर कॅरिबियन संघाने 14 वेळा विजय मिळवला आहे. 20 सामने अनिर्णित राहिले आहेत. वेस्ट इंडिजने भारतात शेवटचा कसोटी सामना 1994 मध्ये जिंकला होता. त्यानंतर ते भारतात कसोटी जिंकू शकलेले नाहीत.

भारत आणि वेस्ट इंडिजचा पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरू होईल. याच थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

भारत-वेस्ट इंडिज कसोटीची लाइव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. सामना सकाळी 9:30 वाजल्यापासून दिसेल, तर टॉस सकाळी 9 वाजता होईल.

जिओचे काही रिचार्ज प्लॅन घेतल्यावर जिओहॉटस्टारचे सबस्क्रिप्शन फ्री मिळते. ते सक्रिय करून तुम्ही कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता सामना फ्री मध्ये पाहू शकता.

Comments are closed.