IND vs WI: भारतात वेस्टइंडीजने शेवटचा कसोटी सामना कधी जिंकला? टीम इंडियाचा 23 वर्षांचा विक्रम अजिंक्य!
टी-20 मधील शानदार कामगिरीनंतर आता पुन्हा खरी कसोटी क्रिकेटची वेळ आली आहे. भारत आणि वेस्टइंडीज (IND vs WI) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिकेची सुरुवात 2 ऑक्टोबरपासून होणार आहे. शुबमन गिल (Shubman gill) पहिल्यांदाच कर्णधार म्हणून आपल्या घरच्या मैदानावर नेतृत्व करताना दिसणार आहे.
गिलवर टीम इंडियाचा वेस्टइंडीजविरुद्ध वर्चस्व कायम ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. भारतीय संघाने मागील २३ वर्षांपासून कॅरेबियन संघाविरुद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. गिलने कर्णधार म्हणून इंग्लंडच्या मैदानावर उत्कृष्ट कामगिरी केली होती.
भारतीय संघाने वेस्टइंडीजविरुद्धची शेवटची कसोटी मालिका 2002 मध्ये गमावली होती. त्यानंतर, भारतात आणि कॅरेबियन भूमीत खेळताना टीम इंडियाला वेस्टइंडीजविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलेला नाही. तर वेस्टइंडीजने शेवटच्या वेळी भारतातली कसोटी मालिका 1983 मध्ये जिंकली होती. म्हणजे मागील 42 वर्षांपासून वेस्टइंडीज भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. आता भारतीय संघ या रेकॉर्डला ही मालिका जिंकून कायम ठेवण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरेल.
भारतीय संघ सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडच्या मैदानावर शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली युवा संघाने दमदार खेळ सादर केला होता. इंग्लंडमध्ये आपली वेगवान गोलंदाजी दाखवणारा मोहम्मद सिराज (Mohmmed Siraj) या मालिकेत रंगतदार कामगिरी करेल. तर केएल राहुल (KL Rahul & Yashsvi jaiswal) आणि यशस्वी जयस्वाल जोरदार प्रदर्शन करतील. यशस्वीने गेल्या एका वर्षात शानदार कामगिरी केली आहे. राहुलने अलीकडेच ऑस्ट्रेलिया-ए विरुद्ध शतक ठोकले.
कर्णधार गिल स्वतःही उत्तम फॉर्ममध्ये आहे. स्पिन विभागात कुलदीपची फिरकीची जादू पाहायला मिळेल. तर रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची जोडी कॅरेबियन फलंदाजांसाठी सोपी नसेल. रोस्टन चेजच्या नेतृत्वाखाली वेस्टइंडीजचा सध्याचा फॉर्म चांगला नाही.
Comments are closed.