Ahilyanagar News – परप्रांतीयांचा विवाहितेवर सामूहिक अत्याचार, गुन्हा दाखल; दोन्ही आरोपी फरार

संगमनेर तालुक्यातील घारगावच्या पठारभागात परप्रांतीयांनी विवाहित महिलेवार सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. परंतु दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.
अधिक माहिती अशी की, घारगावच्या पठारभागात गेल्या अनेक दिवसांपासून वास्तव्यास असलेला पाणीपुरीवाला गणेश प्रजापती व बेकरी चालक सैफुल्ला शेख या दोघांनी मिळून एका 26 वर्षीय विवाहितेला कामाचे आमिष दाखवलं. महिलेचा विश्वास संपादित केला आणि मुंढे कॉम्प्लेक्समध्ये नेऊन आळीपाळीने अत्याचार केला. पीडित महिला घाबरली असल्यामुळे गप्प राहिली. सदर घटना 15 सप्टेंबर रोजी घडली होती. अखेर शेजारील महिलेने धीर दिल्यामुळे पीडितेने पोलीस स्थानक गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. मात्र, दोन्ही आरोपी गाव सोडून फरार झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे गावात सध्या भीताचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आरोपीला तात्काळ अटक करुण कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
Comments are closed.