म्हाडाच्या सानपाड्यातील दोन घरांसाठी 6156 अर्जदारांमध्ये चुरस

>>
म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीमधील 20 टक्के योजनेतील नवी मुंबईतील घरांवर अर्जदारांच्या उड्या पडल्या आहेत. सानपाडा डीपीव्हीजी व्हेंचर्स येथील अत्यल्प उत्पन्न गटाच्या दोन घरांसाठी 6156 अर्ज तर येथीलच अल्प उत्पन्न गटाच्या 17 घरांसाठी 18 हजार 227 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ‘नशिबात असेल तरच घर मिळेल’ असे म्हणायची वेळ आली आहे. अत्यल्प उत्पन्न गटाचे घर 29 चौरस मीटरचे असून या घराची किंमत 14 लाख 42 हजार रुपये तर अल्प उत्पन्न गटाचे घर 37 ते 49 चौरस मीटरचे असून या घराची किंमत 18 ते 25 लाख रुपयांदरम्यान आहेत.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5354 घरांसाठी अनामत रकमेसह 1,58,424 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील सर्वाधिक अर्ज 20 टक्के योजनेतील घरांसाठी आले आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली येथे असलेल्या या योजनेतील 565 घरांसाठी तब्बल 1 लाख 46 हजार 432 अर्ज आले आहेत. दुसरीकडे 15 टक्के योजनेतील घरांना मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. 3002 घरांसाठी केवळ 4985 अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या 1677 घरांसाठी 5046 तर 50 टक्के योजनेतील 41 घरांसाठी 1338 अर्ज आले आहेत.
Comments are closed.