ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान अव्वल; मुकेश नेलावल्लीचे सुवर्ण, तेजस्विनीचे रौप्य

आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कपच्या अखेरच्या दिवशी हिंदुस्थानच्या नेमबाजांनी दमदार कामगिरी करत पदकतालिकेत 19 पदकांसह अव्वल स्थान कायम ठेवले. हिंदुस्थानने या स्पर्धेत 6 सुवर्णांसह 8 रौप्य आणि 5 कांस्य जिंकले. पुरुषांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत हिंदुस्थानचा ज्युनियर विश्वविजेता मुकेश नेलावल्लीने सुवर्णपदक जिंकले, तर याच प्रकारात महिला गटात तेजस्विनी सिंह हिने रौप्यपदकाची कमाई केली.
मुकेशचा अचूक नाव, सुवर्णाची चमक
मुकेशने पुरुषांच्या 25 मीटर पिस्तूल या बिगर-ऑलिम्पिक प्रकारात 585 गुणांची कमाई करत सुवर्णपदक मिळवले. तटस्थ खेळाडू अलेक्सांद्र कोवालेवने 577 गुणांसह रौप्यपदक जिंकले, तर हिंदुस्थानच्या साहिल चौधरीने 573 गुणांसह कांस्यपदकावर नाव कोरले.
तेजस्विनीचे रौप्य, मजबूत प्रदर्शन
यंदा वर्षाच्या प्रारंभीच ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण जिंकलेल्या हिंदुस्थानच्या तेजस्विनी सिंहला या वेळी महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात 30 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तटस्थ खेळाडू अलेक्झांड्रा तिखोनोवाने 33 गुणांसह सुवर्णपदक, तर इटलीच्या अलेसांद्रा फेटने 28 गुणांसह कांस्यपदक पटकावले. इतर हिदुस्थानी खेळाडूंमध्ये नाम्या कपूर चौथ्या, तर रिया थत्ते पाचव्या स्थानावर राहिली.
Comments are closed.