अभिनेता विजयचा राज्यव्यापी दौरा रद्द झाला

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूतील करूर येथे चेंगराचेंगरीत एकेचाळीस जणांचा मृत्यू  होण्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर अभिनेता-राजकारणी विजय यांनी आपला राज्यव्यापी दौरा रद्द केला आहे. बुधवारी यासंबंधीची अधिकृत घोषणा पक्षाकडून करण्यात आली. विजय यांचा पक्ष ‘टीव्हीके’ने त्यांचे सर्व दौरे दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलले आहेत. त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलद्वारे ही घोषणा करण्यात आली.  चेंगराचेंगरीच्या घटनेत आम्ही आमच्या प्रियजनांना गमावले असून त्यांच्या निधनाबद्दल शोक अनावर झालेला आहे. अशा स्थितीत आमच्या पक्षाध्यक्षांच्या पुढील दोन आठवड्यांच्या सार्वजनिक सभेचे वेळापत्रक तात्पुरते पुढे ढकलण्यात येत आहे. सार्वजनिक सभांबाबतचे सुधारित नियोजन नंतर जाहीर केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments are closed.