पंतप्रधान आरएसएसच्या कार्याचे कौतुक करतात

दिल्लीतील कार्यक्रमात उपस्थिती : टपाल तिकिट आणि नाणे जारी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी समारंभाला उपस्थित राहत महत्त्वाच्या मुद्यांवर परखड मतप्रदर्शन केले. संघ स्वयंसेवकांचे कार्य, त्यांचा प्रचार आणि देशसेवेतील योगदान यासंबंधी माहिती देताना कार्यप्रणालीचे कौतुक केले. शिक्षण, आरोग्य, आपत्ती निवारण आणि सामाजिक सेवा यासारख्या क्षेत्रात संघटनेने महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे पंतप्रधान म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित समारंभात विशेष डिझाइन केलेले टपाल तिकिट आणि 100 रुपयांचे स्मारक नाणे जारी केले. यावेळी त्यांनी संघाच्या योगदानावर प्रकाश टाकणारे एक स्मारक टपाल तिकिट आणि नाणे देखील जारी केले. राष्ट्रसेवा आणि समाजाला सक्षम करण्यात सतत गुंतलेले संघ स्वयंसेवक देखील या टपाल तिकिटात प्रतिबिंबित होतात. यासाठी मी देशाचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. 1925 मध्ये नागपूरमध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी आरएसएसची स्थापना केली. हे स्वयंसेवक-आधारित सामाजिक आणि सेवा कार्यासाठी ओळखले जाते.

दसऱ्यापासून आरएसएस आपला शताब्दी वर्षाचा कार्यक्रम सुरू करत आहे. या कार्यक्रमांतर्गत 2 ऑक्टोबर 2025 ते 20 ऑक्टोबर 2026 पर्यंत देशभरात सात प्रमुख कार्यक्रम आयोजित केले जातील. संघ प्रमुख मोहन भागवत अमेरिका आणि काही युरोपीय देशांमध्ये कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होऊ शकतात.

घुसखोरांकडून मोठे आव्हान

पंतप्रधान मोदी यांनी घुसखोरीबाबतही उपस्थितांना सतर्क केले. आपल्याला घुसखोरांपासून धाडसाने लढावे लागेल. आमचे सरकार इतर देशांवरील आर्थिक अवलंबित्व आणि लोकसंख्याशास्त्र बदलण्याचे षड्यंत्र यासारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. घुसखोरांकडून आपल्याला नेहमी अलर्ट रहावे लागेल. या प्रक्रियेत संघाने महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. आरएसएस आणि त्याचे स्वयंसेवक यांचे ‘राष्ट्र प्रथम’ हे एकच उद्दिष्ट आहे.  आरएसएस समाजाच्या अनेक क्षेत्रांमध्ये सतत कार्यरत असल्याचेही ते पुढे म्हणाले.

Comments are closed.