Sangh's Vijayadashami celebrations today

संघाचे शताब्दी वर्ष : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार

नागपूर : प्रतिनिधी

डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षाचं औचित्य साधून यंदाचा विजया दशमी उत्सव विशेष उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. आज 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.40 वाजता रेशीम बाग मैदानावर संघाचा विजया दशमी उत्सव साजरा होत आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहे, सरसंघचालक डॉ मोहन भागवत शताब्दी वर्षा निमित्त स्वयंसेवकांना काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.

यंदाच्या दसरा उत्सवात सुमारे 21 हजार स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडणार आहे. संघाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून तो साजरा केला जाणार आहे.  यावर्षी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त होणाऱ्या विशेष विजयादशमी उत्सवात देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमानंतर सरसंघचालक मोहन भागवत हे शताब्दी वर्षानिमित्त आपलं भाषण करणार आहेत.

परदेशी प्रतिनिधी सहभागी होणार शताब्दी वर्ष असल्यानं यंदा उत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होणार आहे. घाना, थायलंड, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका यांसह अनेक देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विशेष बाब म्हणजे मणिपूरमधील स्वयंसेवकही मोठ्या उत्साहानं या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

शंकर महादेवन यांनी संघ गीतांना उत्तम प्रकारे स्वरबद्ध केले : गडकरी

पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संघ गीतांची निर्मितीची कल्पना कुठे सुचली, ते कसे तयार करण्यात आले याबद्दल माहिती दिली. शंकर महादेवन यांच्या आवाजातील स्वरबद्ध केलेली गाणी ऐकून गडकरींनी दोन्ही हात जोडून महादेवन यांना अभिवादन केले. गडकरी पुढे म्हणाले, शंकर महादेवन यांनी संघ गीतांना उत्तम प्रकारे स्वरबद्ध केले आहे. त्यांना हृदयातून हात जोडून धन्यवाद देतो. मी या कामात निमित्त मात्र आहे.

Comments are closed.