पाकिस्तान आपला दुश्मन…, आशिया कपमधील राड्यानंतर BCCIचा ठाम निर्णय, महिला संघाला दिला आदेश


भारत विरुद्ध पाकिस्तान नाही हँडशेक महिला एकदिवसीय विश्वचषक 2025: आशिया कपदरम्यान भारत-पाकिस्तान क्रिकेट संघांमध्ये जे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, त्याच धर्तीवर आता महिला विश्वचषक 2025 मधील सामन्यातही तणावाची शक्यता वर्तवली जात आहे. 5 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघांमध्ये सामना होणार आहे, आणि त्याआधीच पुन्हा वाद पेटला आहे.

BCCIचा मोठा निर्णय, पाकिस्तानी खेळाडूंशी हात न मिळवण्याचे आदेश (NO Handshake India Vs Pakistan Womens ODI World Cup 2025)

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळने (BCCI)  भारतीय महिला क्रिकेट संघाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, सामन्याच्या आधी किंवा नंतर पाकिस्तानी खेळाडूंशी कोणताही हस्तांदोलन (हात मिळवणे) करणे टाळावे. 1 ऑक्टोबर रोजीच हा संदेश अधिकृतरीत्या संघाला देण्यात आला आहे.

BCCIचे सचिव देवजित सैकिया यांनी पाकिस्तानला ‘दुश्मन देश’ असे संबोधले असून, ज्यामळे आता आणखी वाद पेटू शकतो. बासीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, “संघाने कोणत्याही परिस्थितीत हस्तांदोलन करायचे नाही. बासीसीआय आपल्या खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.”

कोलंबोमध्ये होणार सामना (India Vs Pakistan Womens ODI World Cup 2025 )

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आपल्या महिला संघाला भारतात पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा सामना कोलंबो येथे खेळवला जात आहे.

आशिया कप ट्रॉफीवरून वाद वाढला (Ind vs Pak No Handshake Controversy)

दरम्यान, एकीकडे महिला विश्वचषकातील सामन्यावरून वातावरण तापलेले असताना, दुसरीकडे आशिया कप 2023 च्या विजेतेपदावरूनही वाद सुरू आहे. भारताने अंतिम सामना जिंकून ट्रॉफी पटकावली, मात्र आशियाई क्रिकेट परिषद (ACC) चे प्रमुख आणि PCB चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी दिलीच नाही, असा आरोप BCCI ने केला आहे. या प्रकरणावरून बीसीसीआय चिडले असून, त्यांनी मोहसिन नक्वी यांना अल्टिमेटम दिला आहे. ट्रॉफी लवकरच न मिळाल्यास, आयसीसीकडे तक्रार करण्याचाही विचार केला जात आहे. भारत-पाकिस्तान महिला क्रिकेट सामन्यापूर्वी राजकीय आणि क्रीडा वर्तुळात तणाव वाढलेला असून, मैदानातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. हस्तांदोलनासारख्या साध्या शिष्टाचारालाही राजकारणाची किनार लागल्याने, या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा –

Mohsin Naqvi On Asia Trophy Ind vs Pak: आधी ट्रॉफी घेऊन पळाला, आता माज उतरला; मोहसीन नक्वी BCCI ला माफी मागत काय काय म्हणाला?

आणखी वाचा

Comments are closed.