अय्यरची तुफान फलंदाजी, परागही चमकला, भारताने पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा 171 धावांनी फडशा पाडला


भारताने ऑस्ट्रेलियाला 171 अनधिकृत एकदिवसीय स्कोअरकार्डने पराभूत केले: भारत ‘अ’ संघाने पहिल्या  वनडे सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा 171 धावांनी पराभव केला. हा सामना मूळत 30 सप्टेंबर रोजी होणार होता, परंतु पावसामुळे तो 1 ऑक्टोबरला हलवण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांतच 413 धावांचा डोंगर उभारला, ज्यामध्ये श्रेयस अय्यर आणि प्रियांश आर्य यांच्या शतकांचा समावेश होता. प्रत्युत्तर ऑस्ट्रेलिया ‘अ’ चा संघ 42.5 षटकांत 242 धावांवरच गारद झाला.

टीम इंडियाच्या फलंदाजांनी मारले 39 चौकार आणि 19 षटकार

हा सामना 30 सप्टेंबर रोजी होणार होता, परंतु पावसामुळे तारीख बदलून 1 ऑक्टोबर करण्यात आली. टीम इंडियाकडून प्रियांश आर्यने दमदार खेळी केली, त्याने फक्त 84 चेंडूत 101 धावा काढल्या, त्यात 11 चौकार आणि पाच षटकार मारले. त्याने आणि प्रभसिमरन सिंगने पहिल्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी केली.

भारतीय संघाने 413 धावा करताना चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. टीम इंडियाच्या फलंदाजांनी सामन्यात एकूण 39 चौकार आणि 19 षटकार मारले. भारतीय खेळाडूंनी केवळ चौकारांच्या मदतीने 270 धावा केल्या.

श्रेयस अय्यरच्या शतकानंतर रियान परागही चमकला (Shreyas Iyer Riyan Parag Ind a vs Aus a Unofficial ODI)

श्रेयस अय्यर सध्या टी-20 संघाबाहेर आहे, त्याने अलिकडेच बीसीसीआयला कसोटी क्रिकेटमधून काही वेळ विश्रांती देण्याची विनंती केली होती. दरम्यान, ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने 83 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांसह 110 धावा केल्या. त्याने रियान परागसोबत तिसऱ्या विकेटसाठी 132 धावांची मजबूत भागीदारीही केली. परागने 42 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह 67 धावांची तुफानी खेळी केली. आयुष बदोनीनेही शेवटच्या षटकांमध्ये 27 चेंडूत 50 धावा करत कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगले धुतले.

भारतीय संघाने गोलंदाजीतही ताकद दाखवली आणि ऑस्ट्रेलियाला एकामागून एक धक्के दिले. एका वेळी ऑस्ट्रेलिया अ संघाने फक्त दोन विकेट गमावून 169 धावा केल्या होत्या, परंतु नंतर कांगारूंनी विकेट गमावण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने त्यांचे शेवटचे आठ विकेट फक्त 73 धावांत गमावले. (India Beats Australia by 171 Unofficial ODI Scorecard)

हे ही वाचा –

India Vs Pakistan NO Handshake Womens ODI World Cup 2025 : पाकिस्तान आपला दुश्मन… आशिया कपमधील राड्यानंतर BCCIचा ठाम निर्णय, भारतीय महिला क्रिकेट संघाला दिला मोठा आदेश

आणखी वाचा

Comments are closed.