म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे दसरा गोड; केडीएमसीचे १३३ कर्मचारी झाले साहेब

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील १३३ कर्मचाऱ्यांना आज पदोन्नती मिळाली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा दसरा गोड झाला. म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे वर्षानुवर्षे एकाच जागेवर काम करणारे कर्मचारी आता साहेब बनले आहेत.
पालिकेतील विविध विभागांतील कर्मचारी अनेक वर्षांपासून पदोन्नतीची वाट पाहत होते. म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन बासरे यांनी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना यश आले आणि विविध संवर्गातील १३३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली.
पदोन्नती मिळालेले कर्मचारी सहाय्यक आयुक्त, अतिरिक्त शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक, वरिष्ठ लेख परीक्षक, सिनिअर प्लम्बर, लेखा अधिकारी, पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक बनले आहेत.
पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कामगार संघटनेचे सचिन बासरे, अजय पवार, सुनील पवार, सुरेश तेलवणे यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन आभार मानले.
Comments are closed.