I LOVE America! नाइलाजाने परत जावे लागत आहे; नोकरी गेल्यानंतर तरुणीची भावनिक पोस्ट व्हायरल

अलिकडच्या काळात हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. याच घडामोडींमध्ये एक व्हिडिओ समोर आला आहे. अनन्या जोशी ही एक हिंदुस्थानी मुलगी बराच काळ अमेरिकेत नोकरी करत होती. आता तिला मात्र अमेरिका नोकरी गेल्यामुळे सोडावे लागत आहे. तिला देश सोडण्यास भाग पाडले जात आहे. चांगली नोकरी न मिळाल्यामुळे अनन्याला अमेरिका सोडत हिंदुस्थानात परतावे लागत आहे. याचाच एक व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

अनन्याने तिच्या नोकरीच्या शोधाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केले. २९ सप्टेंबर रोजी तिने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती आता अमेरिका सोडत असल्याचे तिने सांगितले. तसेच तिने अमेरिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ती म्हणते हा देश सोडणे हा माझ्यासाठी फार कठीण आणि इमोशनल क्षण आहे. हे दुःख सतत सलत राहील.

अनन्याने व्हिडिओमध्ये म्हटले की, अमेरिका हे माझे कायम पहिले घर असेल. या देशाने अतिशय अविस्मरणीय अनुभव दिले आहेत. स्वतंत्र म्हणून काम करताना अमेरिका माझे पहिले घर होते आणि ते माझ्यासाठी नेहमीच खास राहील. जरी मी थोड्या काळासाठी राहिले तरी, या देशाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीची मी आयुष्यात कायम कदर करेन. तिने शेवटी म्हटले, “I Love America.”

नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवणाऱ्या अनन्याने २०२४ मध्ये एफ-१ ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रोग्रामद्वारे बायोटेक स्टार्टअपमध्ये कामाचा अनुभव मिळवला. तिला अलीकडेच नोकरीवरून काढून टाकण्यात आले आणि आता ती नवीन नोकरी शोधत आहे. एफ-१ ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग (ओपीटी) प्रोग्राममुळे अमेरिकेत एफ-१ व्हिसावर असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास सुरू असताना १२ महिन्यांपर्यंत तात्पुरते काम करण्याची परवानगी मिळते.

Comments are closed.