मध्यरात्री रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली अज्ञातांनी रिक्षाचालकाला भोसकले, जागेवर प्राण गेला ; संभ
छत्रपती संभाजीनगर गुन्हे: छत्रपती संभाजीनगर शहरात वारंवार गुन्हेगारी घटना समोर येत असून शहरातील सर्वात गजबजलेल्या रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ( 1 ऑक्टोबर ) थरकाप उडवणारी घटना घडली आहे. रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली एका तरुणाला धारदार शस्त्राने वार करून जागेवर संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा शोध सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने घेतला जात आहे. (Crime news)
इमरान शेख हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रिक्षा चालक म्हणून काम करणारा हा तरुण बुधवारी रात्री संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली थांबला होता. त्यावेळी चारचाकीतून आलेल्या दोघांनी त्याला गाठलं. कोयत्याने त्याच्यावर वार करत त्याची निर्घृण हत्या केली.
Sambhajinagar Crime: नेमके प्रकरण काय ?
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाणपुलाखाली घडली आहे . शहरातील सर्वात गजबजलेला भाग म्हणून हा परिसर ओळखला जातो . 1 ऑक्टोबरला रात्री उशिरा ही घटना घडली आहे .इमरान शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून हा तरुण शहरात रिक्षा चालक आहे .बुधवारी रात्री संभाजीनगरच्या रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाणपुलाखाली इमरान आला होता .त्यावेळी कारमधून आलेल्या दोन अज्ञान व्यक्तींनी त्याला गाठलं .हातातील धारदार कोयत्याने वार करत त्याच्यावर हल्ला चढवला . अचानक झालेल्या हल्ल्यात रिक्षाचालक क्षणार्धात कोसळला . हल्ला केल्यानंतर आरोपी कारमधून पसार झाले .या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला होता .स्थानिकांनी घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली .त्यानंतर घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी परिसराची पाहणी करत पंचनामा केला .पुढील तपासासाठी मृतदेह घाटी रुग्णालयात हलवण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत .हत्या नेमकी कशामुळे झाली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे .पुढील तपास सुरू आहे .
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.