‘स्टुडंट ऑफ द गेम’, ‘त्या’ दौऱ्यापूर्वी मी ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंचा सल्ला घेतला, शुभमन गिल


शुभमन गिल ऑन इंड वि इंजीः भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यात जून-ऑगस्टदरम्यान 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेली ही मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली. शुभमन गिलने (Shubhman Gill) पहिल्यांदाचा इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत कर्णधारपदाची भूमिका सांभाळली. शुभमन गिलने या कसोटी मालिकेत पाच सामन्यात 754 धावा केल्या. यामध्ये 4 शतकांचा देखील समावेश आहे. तसेच शुभमन गिल मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. या इंग्लंड दौऱ्याआधी शुभमन गिलने भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे फलंदाज  स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि मॅथ्यू वेडकडून (Matthew Wade) काही टिप्स घेतल्या होत्या. याबाबत स्वत: शुभमन गिलने माहिती दिली.

सध्या गुजरातमधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटी सामनादरम्यान शुभमन गिलची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये शुभमन गिलने इंग्लंडच्या दौऱ्यावर महत्वाचं भाष्य केलं. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी मी आधी सचिन तेंडुलकर मग मॅथ्यू वेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याशी बोललो होतो. त्यांच्याकडून काही टिप्स मिळाल्या होत्या, असं शुभमन गिल म्हणाला. यावरुन शुभमन गिलमध्ये नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती असल्याचं दिसून येतं.

इंग्लंडविरुद्ध मालिका संपल्यानंतर शुभमन गिल काय म्हणाला होता? (Shubhman Gill On Ind vs Eng)

शुभमन गिलला जेव्हा विचारण्यात आलं की या सहा आठवड्यांच्या मालिकेतून तू काय शिकलास, तेव्हा गिल म्हणाला की, “कधीही हार मानू नका (Never Give Up).” भारताने पाचवा कसोटी सामना अशा स्थितीत जिंकला, जेव्हा त्यांची विजयाची शक्यता फारशी नव्हती. पाचव्या दिवसाची सुरुवात इंग्लंडला केवळ 35 धावा हव्या होत्या, तर भारताला 4 विकेट्स मिळवायच्या होत्या. अशा कठीण क्षणीही भारताने शेवटपर्यंत लढा दिला आणि इंग्लंडला अवघ्या 6 धावांनी पराभूत करत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली.

संबंधित बातमी:

IND vs WI : DSP मोहम्मद सिराजसमोर वेस्ट इंडिजची दाणादाण, काही समजण्याआधीच किंगला केलं क्लीन बोल्ड, पाहा Video

आणखी वाचा

Comments are closed.