जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि चिंपांझी तज्ञ जेन गुडॉल यांचे 91 व्या वर्षी निधन

जगातील सर्वात प्रसिद्ध चिंपांझी शास्त्रज्ञ जेन गुडॉल यांचे १ ऑक्टोबरला वयाच्या ९१ व्या वर्षी लॉस एंजेलिस येथे निधन झाले. जेन गुडॉल इन्स्टिट्यूट (जेजीआय) ने बुधवारी एका निवेदनात याची पुष्टी केली. जेन गुडॉल यांनी आयुष्यभर प्राणी, जंगले आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी संघर्ष केला.

जेन मॉरिस-गुडॉल यांचा जन्म ३ एप्रिल १९३४ रोजी लंडनमध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांचे प्राण्याच्या प्रती प्रेम हे वाखाणण्याजोगे होते. जेन गुडाॅल यांनी प्रामुख्याने चिंपांझीवर महत्त्वाचे संशोधन केले होते. जेन वर्षातून सुमारे ३०० दिवस जगभर प्रवास करत असत. वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणीय संकटावर त्या व्याख्याने देत असे.

जेन गुडॉल यांनी आफ्रिकेत चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी अनेक वर्षे घालवली. त्यांना आढळले की चिंपांझी केवळ फळेच खात नाहीत तर मांस देखील खातात, हत्यारे वापरतात आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व, मैत्री आणि नातेसंबंध वेगळे असतात. जेनने त्यांना संख्यांऐवजी नावे दिली आणि त्यांच्या कृती आणि वर्तनाचे काळजीपूर्वक निरीक्षण केले होते. त्यांच्या कामामुळे विज्ञानाच्या जगात नवीन विचारसरणी आली आणि प्राण्यांबद्दल लोकांचा दृष्टिकोन बदलला.

गुडाॅल यांचे संशोधन संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी होते. १९६० पासून टांझानियाच्या गोम्बे जंगलात चिंपांझींवरील त्यांच्या अभ्यासाने केवळ वैज्ञानिक संकल्पनाच बदलल्या नाहीत तर प्राण्यांनाही भावना, व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक वर्तन असते हे देखील सिद्ध केले. गुडॉलच्या शोधांमुळे मानव आणि प्राण्यांमधील अस्पष्ट रेषा स्पष्ट झाली.

जेन गुडॉल यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवातीची वर्षे चिंपांझींवर संशोधन करण्यात घालवली. परंतु नंतर त्या निसर्ग आणि हवामान संवर्धनासाठी आवाज उठवणाऱ्या ठरल्या. आफ्रिकेतील वन्यजीवांच्या झपाट्याने होणाऱ्या घटीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि लोकांना इशारा दिला की, आपण आपल्या ग्रहाचे आणि आपल्या प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.

Comments are closed.