Mumbai News – मसाजची हौस महागात पडली, नग्न व्हिडिओ काढत हायकोर्टाच्या वकिलाला लुबाडले

मसाज पार्लरमध्ये जाऊन मसाज करणे एका वकिलाला चांगलेच महागात पडले आहे. मसाज दरम्यान नग्न व्हिडिओ काढत मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलाकडून लाखो रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वकिलाने दिलेल्या फिर्यादीवरून बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक फरार आहे. समीर अली हनीफ खान आणि भूपेंद्र भगवान सिंग अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीवलीत राहणारे वकील मसाज सेंटरमध्ये मसाजसाठी गेले असताना आरोपीने त्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला. यानंतर हा व्हिडिओ करण्याची धमकी देत वारंवार पैशांची मागणी केली. अखेर या धमक्यांना कंटाळून वकिलाने बोरीवली पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींनी पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मसाज पार्लरमध्ये प्रत्येक ग्राहकासोबत ही घटना घडल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
Comments are closed.