दृष्ट लागणे म्हणजे काय? लागल्यास दिसतात हे संकेत
लहानपणापासून आपण घरात किंवा आजूबाजूला ऐकत आलो आहोत की, दृष्ट लागली आणि त्याची दृष्ट काढली. खूप मेकअप करून घराबाहेर पडू नका, काळा टिळा लावा नाहीतर दृष्ट लागेल, रात्रीपर्यत बाहेर राहू नका, अशा अनेक गोष्टी. दृष्ट लागणे, नजर लागणे हा शब्द लहान मुलांच्या बाबत अधिक वापरला जातो. यावर, असे अनेक लोक आहेत ज्यांना दृष्ट वैगेरे लागणे हा प्रकार बिलकूल मान्य नाही. पण, दृष्ट किंवा नजर लागणे म्हणजे काय? ती खरंच लागते का? लागल्यास ती कशी ओळखावी? हे सर्व आपण जाणून घेऊयात,
दृष्ट लागल्याचे संकेत –
वाईट स्वप्न –
असे सांगितले जाते की, कुटूंबातील कोणत्याही सदस्याला वाईट स्वप्ने पडू लागली तर त्याला दृष्ट लागलेली आहे.
हेही वाचा – मासिक पाळी येताच झाडाशी लावतात लग्न, भारतात पाळली जाते विचित्र प्रथा
आजारपण –
घरातील मुले विनाकारण आजारी पडू लागले किंवा सतत रडत असेल तर त्याला दृष्ट लागली असे बोलले जाते. अशा परिस्थितीत अनेकदा आपल्या आई-आजी लहान बाळाची दृष्ट काढतात.
समस्यांमध्ये भर पडणे –
आयुष्यात अचानक समस्या वाढणे किंवा काही विचित्र घटना घडणे हे दृष्ट लागल्याचे लक्षण असू शकते.
कामात अडथळे –
ठरवलेली कामे योग्यरित्या न होणे किंवा अचानक कामात अडथळे येणे.
दुःख –
मन सतत उदास राहणे आणि कोणत्याही कामात उत्साह नसणे.
तुळस सुकणे –
चांगली तुळस कोमेजायला लागली तर ते दृष्ट लागण्याचे संकेत मानले जातात.
(वरील माहिती विविध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही, हे लक्षात घ्यायला हवे.)
हेही वाचा – Money Plant : चोरलेला मनीप्लांट घरात लावावा का? वास्तुशास्त्र काय सांगतं?
Comments are closed.