China Open – कोको गॉफची उपांत्य फेरीत धडक

गतविजेत्या कोको गॉफ हिने ईव्हा लिसला पराभूत करून चायना ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. कोको गॉफ हिने 6-3, 6-4 अशा फरकाने विजय मिळवत सलग तिसऱ्या वर्षी उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले. अमेरिकेची दुसरी मानांकित कोको सुरुवातीला अडचणीत सापडली, मात्र या संधीचा फायदा घेण्यात ईव्हाला अपयश आले. जर्मनीच्या लिसला यापैकी केवळ तीनच संधीचा फायदा घेता आला. गॉफविरुद्ध पाच वेळा सर्व्हिस गमावणे लिसला चांगलेच महागात पडले. दरम्यान, उपांत्य फेरीत गॉफसमोर अमांडा अनिसिमोवा किंवा इटलीच्या जॅस्मिन पाओलिनीचे आव्हान असणार आहे.

Comments are closed.