आयएलटी-20 च्या लिलावात अश्विन विकलाच गेला नाही

आयएलटी–20 स्पर्धेच्या लिलावात हिंदुस्थानचा माजी दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला खरेदी करण्यात कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. मात्र वाईल्ड कार्डमार्फत त्याला संघात संधी मिळू शकते.

आयपीएलमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर अश्विनने यूएईच्या लीग स्पर्धेत आपली नोंदणी केली आहे. आयपीएलमधून निवृत्ती स्वीकारल्यामुळे अश्विन आता जगभरातील लीग स्पर्धा खेळू शकतो.

गेल्या आठवडय़ात 39 वर्षीय अश्विनने बिग बॅश लीग स्पर्धेत सिडनी थंडरसोबत करार केला आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत तो हिंदुस्थानी संघातून खेळणार आहे.

अश्विनने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते.

Comments are closed.