Asia Cup: अफवा बंद करा, ट्रॉफी पाहिजे तर…; मोहसीन नक्वी पुन्हा बरळला…

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि मंत्री मोहसीन नक्वी यांच्याविषयी काल भारतीय माध्यमांमध्ये अफवा पसरली की, त्यांनी दुबईत झालेल्या एसीसी बैठकीत बीसीसीआयकडे माफी मागितली आहे. मात्र नक्वींनी स्वतः एक्सवर पोस्ट करत या बातम्यांना पूर्णपणे खोडसळ ठरवले आहे.

नक्वी म्हणाले, “मी कधीही बीसीसीआयकडे माफी मागितली नाही आणि कधीही मागणार नाही. भारतीय माध्यमे खोट्या अफवांवर भर देत आहेत. मी फक्त सत्य स्पष्ट करू इच्छितो की, मी काहीही चुकीचे केलेले नाही. ही अफवा केवळ प्रचारासाठी पसरवली गेली आहे.”

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “मी ट्रॉफी देण्यास आजही तयार आहे, पण भारतीय संघाला ती हवी असल्यास त्यांनी एसीसीच्या कार्यालयात येऊन माझ्या हस्ते घेणे आवश्यक आहे. दुर्दैवाने, भारतीय क्रिकेटमध्ये सतत राजकारणामुळे खेळाच्या भावनेला धक्का बसतो आहे. मी एसीसीचा अध्यक्ष म्हणून त्या दिवशीही भारतीय संघाला ट्रॉफी देण्यास तयार होतो.”

मीडिया रिपोर्टनुसार, काही बातम्यांमध्ये असे सांगितले गेले की, नक्वींनी आशिया कप पारितोषिक वितरणाबाबत माफी मागितली आणि भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने दुबईत येऊन पदक घ्यावे. परंतु नक्वींनी यास पूर्णपणे फेटाळले आहे.

मोहसीन नक्वींचा संदेश स्पष्ट आहे: अफवा अफवा आहेत, ट्रॉफी देण्याची तयारी आहे, परंतु भारतीय संघाला प्रत्यक्षात येऊन ती घेणे आवश्यक आहे. राजकारणाच्या कारणामुळे खेळाच्या भावनेवर परिणाम होऊ नये, आणि क्रिकेटला मोठं करण्यासाठी खेळावर लक्ष देणे गरजेचे आहे, असा त्यांच्या पोस्टमधून सूर दिसतो.

Comments are closed.