Maharashtra Rains Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकव
Maharashtra Rains Live Updates: शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदमांनी खळबळजनक आरोप केलाय…एकनाथ शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केलाय.बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते? असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.रामदास कदम गोरेगावच्या नेस्को पार्कवरील दसरा मेळाव्यात बोलत होते. यावेळी रामदास कदमांच्या आरोपाने खळबळ माजली आहे.रामदास कदम म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच निधन कधी झालं?त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर होता? दोन दिवस बाळासाहेबांचा मृतदेह का ठेवला , तुमचं अंतर्गत काय चाललं होतं? असा सवाल रामदास कदमांनी केलाय. तर रामदास कदम फालतू माणूस आहे, अशी जळजळीत टीका माजी खासदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंनी केलीये…रामदास कदम कसे आहेत, हे मला चांगलं माहिती आहे असा टोलाही चंद्रकांत खैरेंनी लगावलाय…दरम्यान रामदास कदम हे काहीही बोलतात अशी टीका देखील खैरेंनी केलीये. या बातम्यांसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…
Comments are closed.