IND vs WI: जसप्रीत बुमराहची विक्रमांची आतषबाजी, कपिल देवसह इतर दिग्गजांना टाकलं मागे

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने आपल्या शानदार गोलंदाजीने इतिहास रचला. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात बुमराहने तीन बळी घेत एक घातक स्पेल टाकला. बुमराहने 2025 मध्ये सर्वाधिक बोल्ड विकेट (त्रिफळाचित) मिळवणाऱ्या गोलंदाजाचा विक्रम केला आहे.

जसप्रीत बुमराहने या वर्षी आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 12 फलंदाजांना बोल्ड केलं आहे. त्याच्यानंतर मोहम्मद सिराज (9) आणि शमार जोसेफ (9) यांचा क्रमांक लागतो. मिचेल स्टार्क (7), स्कॉट बोलँड (6) आणि जोमेल वॉरिकन (6) हे देखील यादीत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, बुमराहने 2025 मध्ये क्लिन बोल्ड करुन 15 बळी घेतले आहेत. या वर्षी कोणत्याही पूर्ण सदस्यीय गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

बुमराहने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 147 बोल्ड विकेट घेतले आहेत, जो भारतासाठी चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या आधी अनिल कुंबळे (186), कपिल देव (167) आणि रविचंद्रन अश्विन (151) आहेत. बुमराहने रवींद्र जडेजा (145) ला मागे टाकत यादीत अव्वल स्थान पटकावले.

बुमराहने अहमदाबाद कसोटीत आणखी एक टप्पा गाठला. त्याने भारतात 50 कसोटी विकेट्स पूर्ण केले. बुमराहने केवळ 24 डावात हा विक्रम केला आणि कपिल देवचा विक्रम मोडला. कपिल देवने 25 डावात भारतात 50 कसोटी बळी गाठले होते. आता, बुमराह आणि जवागल श्रीनाथ हे भारतात 50 बळी घेणारे संयुक्त जलदगती गोलंदाज आहेत. त्यांच्यानंतर कपिल देव (25), इशांत शर्मा (27) आणि मोहम्मद शमी () यांचा क्रमांक लागतो.

बुमराहने 17च्या प्रभावी सरासरीने घरच्या मैदानावर 50 विकेट्स घेतल्या आहेत. आशियाई परिस्थितीत खेळणाऱ्या गोलंदाजांमध्ये ही सर्वोत्तम सरासरी आहे.

वेस्ट इंडिजचा पहिला डाव 162 धावांवर संपला. भारताकडून मोहम्मद सिराजने चार आणि जसप्रीत बुमराहने तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Comments are closed.