महिला विश्वचषकात 'आझाद काश्मीर'चा वाद, पाकिस्तानने भारताला डिवचलं

गुरुवार 2 ऑक्टोबर रोजी, श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील महिला विश्वचषक सामन्यादरम्यान, पाकिस्तानच्या माजी कर्णधार सना मीरने नतालिया परवेझबद्दल असे विधान केले ज्यामुळे वाद निर्माण झाला. तिने नतालियाचे वर्णन आझाद काश्मीरची खेळाडू असे केले.

पाकिस्तान-बांगलादेश सामन्यादरम्यान नतालिया परवेझच्या पार्श्वभूमीवर चर्चा करताना, सना मीर (Sana Mir) म्हणाली की, परवेझ “आझाद काश्मीर” मधून येते. तिच्या या विधानामुळे भारतीय चाहते प्रचंड संतप्त झाले आहेत आणि ते सर्व स्थरातून जोरदार ट्रोल करत आहेत. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, परंतु पाकिस्तान अनेक दशकांपासून त्यावर दावा करत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वाद भडकले आहेत. महिला विश्वचषकातही हे वाद सुरूच आहेत. कोलंबो येथे 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महिला विश्वचषक सामन्यापूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय महिला क्रिकेट संघाला पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचे त्यांचे धोरण सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

यावेळी बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले, “भारत कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळेल. सर्व क्रिकेट प्रोटोकॉलचे पालन केले जाईल. मी तुम्हाला फक्त एवढेच आश्वासन देऊ शकतो की एमसीसीचे क्रिकेट नियम पाळले जातील. हस्तांदोलन असो किंवा मिठी असो, मी सध्या तुम्हाला काहीही खात्री देऊ शकत नाही.”

Comments are closed.