‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट, महिलांचे काढलेले फोटो अन्…चैतन्यानंदच्या चौकशीतू
दिल्ली: दिल्लीच्या वसंत कुंज परिसरात १७ विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण (Delhi Crime News) प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. आरोपी, स्वयंघोषित स्वामी चैतन्यनंद उर्फ पार्थ सारथी याने काही पीडितांना (Delhi Crime News) दुबईच्या शेखसाठी मुलींची व्यवस्था करण्याबद्दल विचारले होते. आरोपीने विद्यार्थिनीला तिच्या ज्युनिअरबाबत आणि दुसऱ्या एका मैत्रिणींबाबत माहिती देण्यास सांगितले होते. पीडित विद्यार्थींनीसोबत आरोपीचे चॅट्स (Delhi Crime News) उघड झाल्यानंतर हा खळबळजनक खुलासा झाला. त्याच्या मोबाईल फोनवर आरोपीसोबत मोठ्या प्रमाणात चॅट्स आढळून आले(Delhi Crime News).
Delhi molester baba: “माझ्यासोबत झोपायला आली नाही”
दक्षिण-पूर्व जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीचा एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. त्या मोबाईल फोनवर विद्यार्थींनीसोबतच्या १,००० हून अधिक लैंगिक स्पष्ट चॅट्स आढळल्या. एका चॅटमध्ये, तो पीडितेला विचारतो की ती त्याच्यावर का रागावली आहे. आरोपी दररोज विद्यार्थींनींना गुड मॉर्निंग मेसेज पाठवत असे. एका चॅटमध्ये तो एका विद्यार्थींनीला “बेटा” असेही म्हणत असे. दुसऱ्या चॅटमध्ये तो एका पिडीतेला म्हणाला की ती त्याच्यासोबत झोपायला आली नाही.
दुसऱ्या एका चॅटमध्ये तो पीडितेला सांगतो की तो एका डिस्को पार्टीला जात आहे. तो पिडीतेला डिस्को डान्ससाठी त्याच्यासोबत येण्यास सांगतो. पोलिसांना अशा असंख्य चॅट सापडल्या आहेत, ज्यात अत्यंत अश्लील भाषा आहे. त्याने एका विद्यार्थिनीला विचारले की दुबईचा एक शेख शारिरीर संबंध ठेवू इच्छितो आहे, तिची कोणी मैत्रिण आहे का? यावर पीडितेने ते स्पष्टपणे नाकारले.
तो विद्यार्थिनींना महागड्या भेटवस्तू देत असे. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की आरोपीने विद्यार्थिनींना महागड्या भेटवस्तूही दिल्या. तो त्यांना महागडे कपडे आणि दागिने पुरवत असे. त्याने त्यांना परफ्यूम देखील भेट म्हणून दिला.
Delhi molester baba: तो आश्रमाबाहेर महिला विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्ये करायचा
पोलिस तपासात असे दिसून आले आहे की आरोपी आश्रमाबाहेर महिला विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्ये करत असे. तो त्यांना उत्तराखंड आणि दिल्लीला घेऊन जात असे. पोलिसांच्या तपासात असेही आढळून आले की त्याने काही महिला विद्यार्थ्यांना भारताबाहेर नेले होते. पोलिस पथकांनी बागेश्वर, अल्मोडा आणि पळून जाताना तो जिथे राहिला होता त्या इतर ठिकाणी भेट देऊन याची पडताळणी केली.
Delhi molester baba: सेक्स टॉयचा नाद होता
आश्रमात अश्लील साहित्य आणि व्हिडिओ सापडले आहेत. पोलिस उपायुक्त अमित गोयल म्हणाले की, तपासादरम्यान, पोलिस पथक बुधवारी आरोपी पार्थ सारथीसोबत श्रीसिम येथे गेले आणि त्याच्या परिसराची झडती घेतली. झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. त्याला सेक्स टॉयचा नाद होता व त्याच्या खोलीतून ५ पॉर्न सीडी जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. त्याच्या मोबाइल फोनमध्ये एक सीसीटीव्ही मॉनिटरिंग अॅप होते. याद्वारे तो परिसर व वसतिगृहावर नजर ठेवत होता. त्याने अनेक महिला व कर्मचाऱ्यांचे न सांगता फोटो काढले आहेत. तो त्यांच्यावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवत होता. त्यांना त्याने पाठवलेले अश्लील संदेश डिलीट करण्यास भाग पाडले होते. यात तीन महिला त्याच्या संस्थेत मोठ्या पदावर होत्या.
Delhi molester baba: चॅटिंगमध्ये नेमके काय?
बाबा चैतन्यानंद विद्यार्थिनींशी अश्लील चॅटिंग करीत होता. त्यात तो थेट लैंगिक सुखाची मागणी करीत होता. या चॅटचे काही स्क्रीन शॉटही पोलिसांनी मिळवले आहेत. यावरून त्याच्यावर केलेल्या आरोपांच सिध्द होतात आहे. तो फरार असल्याच्या काळात उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी लपला होता व विद्यार्थिनींशी चॅट करण्यासाठी त्याने लंडनच्या एका सिम कार्डचा वापर केला होता. फरार असल्याच्या काळात पोलिसांपासून वाचण्यासाठी तो याच सिम कार्डचा वापर करत होता.
Delhi molester baba: कशी करायचा फसवणूक ?
महिलांना एअरहोस्टेस होण्याचे किंवा त्याच्या संस्थेत पद देण्याचे आमिष दाखवून तो संवादास सुरुवात करीत होता. महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्याने त्याचे कार्यालय एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणे केले होते. तो महिलांना महागड्या वस्तू भेट देत होता. त्याने केलेल्या कृत्याचा त्याला पश्चात्ताप होत नसून, पोलिसांना तो चौकशीत वारंवार खोटे बोलत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.