अभिषेक शर्मापेक्षाही डेंजर; युवराज सिंगने आता नवीन खेळाडू शोधला, ट्रेनिंग सुरु, कोण आहे तो?


युवराज सिंग-प्रियानश आर्य: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधलं. तसेच या स्पर्धेत अभिषेक शर्माला मालिकावीरचा पुरस्कार मिळाला. दरम्यान, अभिषेक शर्माच्या या यशामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) याचा मोठा वाटा आहे.

युवराज सिंगने अभिषेक शर्माला क्रिकेटचं प्रशिक्षण दिलं आहे. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) त्याच्या यशाचं श्रेय युवराज सिंगला देतो. युवराज सिंग मुळं यश मिळाल्याचं तो म्हणतो. दोन तीन वर्ष केवळ क्रिकेट नाही तर वैयक्तिक पातळीवर देखील युवराज सिंगनं मदत केल्याचं अभिषेक शर्मा अनेक मुलाखतीमध्ये सांगताना दिसला. आशिया चषकानंतरही अभिषेक शर्माच्या कमागिरीवरुन युवराज सिंगचंही कौतुक झाला.

अभिषेक शर्मासह भारतीय कसोची क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल यालाही युवराज सिंगने प्रशिक्षण दिलं आहे. आशिया चषकात शुभमन गिलनेही चांगली कामगिरी केली. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मानंतर आता युवराज सिंगने आणखी एका खेळाडूला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. हा खेळडू अभिषेक शर्मापेक्षाही खतरनाक आहे. आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळाताने आक्रमक फलंदाजी करत त्याने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

प्रियणश आर्यला युवराज सिंगकादुन प्रशिक्षण- (युवराज सिंह यांनी प्रशिक्षित प्रियश आर्य)

प्रियांश आर्य (Priyansh Arya) हा डावखुरा फलंदाज आहे. सध्या प्रियांश आर्यला युवराज सिंग प्रशिक्षण देतोय. युवराज सिंग आणि प्रियाशं आर्यचे प्रशिक्षणदरम्यानचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या प्रियांश आर्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत अ संघाकडून खेळत आहे.

डीपीएलमध्ये आर्यने 6 चेंडूत मारले 6 षटकार- (प्रियणश आर्य 6 वाटीमध्ये 6 सहा धावा))

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने प्रियांश आर्यला 3.80 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. प्रियांश आर्यने दिल्ली प्रीमियर लीग (DPL) 2024 मध्ये खळबळ उडवून दिली होती. 2024 च्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सविरुद्धच्या सामन्यात दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आर्यने एका षटकात सहा षटकार मारले होते. त्याच्या संघाने 20 षटकांत 308/5 असा विक्रमी धावांचा डोंगर उभारला. त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत फक्त 11 टी-20 सामने खेळले आहेत. यानंतर, मेगा लिलावात, पंजाब किंग्जने या फलंदाजाचा त्यांच्या संघात समावेश केला.

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा भारतीय-

प्रियांश आर्य आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. 2025 च्या आयपीएलच्या हंगामात प्रियांश आर्यने पंजाब किंग्सकडून खेळाताना विस्फोटक शतक झळकावलं होतं. आतापर्यंत सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाज युसूफ पठाण आहे, ज्याने 2010मध्ये 37 चेंडूत शतक पूर्ण केले होते, तर प्रियांशने 39 चेंडूत शतक पूर्ण केले होते. तो पंजाब किंग्जसाठी शतक करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाजही बनला आहे.

संबंधित बातमी:

प्रियानश आर्य पीबीक्स वि सीएसके आयपीएल 2025: प्रियानश; पंजाबाचा बातमी

आणखी वाचा

Comments are closed.