सिराजचा मिया मॅजिक: मिचेल स्टार्कला मागे टाकत मिळवला नंबर-1 स्थान
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. वेस्ट इंडिजचे फलंदाज मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांच्या दमदार गोलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत ज्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले.
मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात चार बळी घेतले. यासह, तो 2025-25 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत WTC सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आणि हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाज मिशेल स्टार्कच्या नावे होता. 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सिराजने 31 बळी घेतले आहेत, तर स्टार्कने सध्या 29 बळी घेतले आहेत. सिराजने आता त्याला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
मोहम्मद सिराजने 2020 मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून तो संघातील तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने 42 कसोटी सामन्यांमध्ये 127 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये पाच वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.
पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचे फलंदाज खूपच खराब कामगिरी केले. परिणामी, संघ फक्त 162 धावांवर गुंडाळला गेला. विंडीजकडून जस्टिन ग्रीव्हजने सर्वाधिक 32 धावा केल्या. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी, भारताने 2 विकेट्स गमावून 121 धावा केल्या. केएल राहुल आणि शुबमन गिल खेळत आहेत. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजपेक्षा 41 धावांनी पिछाडीवर आहे.
Comments are closed.