केएल राहुल आणि शुभमन गिलवर सर्वांचे लक्ष, दुसऱ्या दिवसाचा खेळ किती वाजता होणार सुरू?
India Vs West Indies Live Score, 1st Test Day 2 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या 162 धावांत आटोपला. त्यानंतर पहिल्या दिवसाखेरीस भारताने 2 बाद 121 धावा केल्या. सध्या कर्णधार शुभमन गिल आणि के.एल. राहुल अर्धशतक ठोकून मैदानावर आहे. भारताला यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन या दोन खेळाडूंच्या रूपाने झटके बसले आहेत. टीम इंडिया अजूनही वेस्ट इंडिजपेक्षा 41 धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचे लक्ष्य पहिल्या डावात भक्कम धावसंख्या उभी करण्यावर आहे, जेणेकरून दुसऱ्यांदा फलंदाजी करावी लागू नये. मात्र अहमदाबादमध्ये पावसाचा इशारा दिला गेल्याने सामन्यात खंड पडण्याची शक्यता आहे.
Comments are closed.