47 वर्षांची प्रतीक्षा संपली, गिलने गावस्कर यांचा विक्रम गाठत रचला इतिहास!

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टेस्ट सामना 2 ऑक्टोबरपासून नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. 3 ऑक्टोबर हा सामन्याचा दुसरा दिवस ठरला. पहिल्या सत्रात शुबमन गिलने शानदार अर्धशतक झळकावले (In the first session, Shubman Gill scored a brilliant half-century) आणि केएल राहुलनेही शतक ठोकले. घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून गिलने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावत मोठी कामगिरी केली. यासोबतच त्याने सुनील गावस्कर यांच्या विक्रमाची बरोबरी केली. गावस्करांनी हा विक्रम तब्बल 47 वर्षांपूर्वी केला होता. आता गिलनेही आपले नाव त्या यादीत कोरले आहे.

शुबमन गिलने तब्बल 47 वर्षांपूर्वीचा विक्रम गाठत सुनील गावस्कर यांच्या बरोबरीने आपले नाव नोंदवले.1978 साली वेस्ट इंडिजविरुद्ध सुनील गावस्कर यांनी भारतीय कर्णधार म्हणून घरच्या मैदानावर पहिल्याच सामन्यात 205 धावांची धमाकेदार खेळी केली होती. तर आता गिलने 50 धावा करून घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून अर्धशतक झळकावणारा दुसरा खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे. गेल्या 47 वर्षांत कोणीही हा विक्रम गाठू शकले नव्हते, पण गिलने हे अशक्य वाटणारे काम साध्य केले.

गिलने 100 चेंडूत 50 धावांची खेळी केली. या सामन्यात त्याने मनमोकळेपणाने फटकेबाजी केली आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांविरुद्ध उत्तम फलंदाजी दाखवली. तो आपली अर्धशतकी खेळी शतकात रूपांतरित करू शकला नाही. गिलने आपल्या नावावर 5 चौकार नोंदवले. त्याच्याशिवाय केएल राहुलने शतकी खेळी साकारली. पहिल्या दिवसाच्या अखेरीस तो अर्धशतक ठोकून नाबाद राहिला होता. परंतु दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच त्याने संयम राखत शतक झळकावले. राहुलने 197 चेंडूत 100 धावा केल्या, ज्यात 12 चौकारांचा समावेश होता.

Comments are closed.