Fashion Tips : प्रत्येक मुलीच्या वॉडरोबमध्ये असायला हवेत हे कपडे

मुलींना फॅशनबाबतीत कायम अव्वल राहायचे असते, त्यामुळे मुली विविध प्रकारचे आउटफिट खरेदी करण्यावर भर देतात. पण, तरीही अनेक मुलींना दररोज एकच प्रश्न पडतो की, आज काय घालू? तुम्हालाही असा प्रश्न पडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वॉडरोबमध्ये ढिगभर कपडे असतात पण, त्यातील अर्ध्याहून अधिक हे एकाच रंगाचे, एकाच पॅटर्नचे असतात. त्यामुळे आपल्याकडे कपडेच नाहीत असे वाटते. अशा परिस्थितीत तुम्ही स्मार्ट युक्त्या वापरायला हव्यात. आज आपण अशा कपड्यांचे पॅटर्न पाहूयात जे प्रत्येक मुलीच्या वॉडरोबमध्ये असायला हव्यात.

टिपा –

  • हल्ली बऱ्याच मुली वेस्टर्न ड्रेस घालण्यास पसंती दर्शवतात. तुम्हाला जास्त मॉडर्न वेस्टर्न कपडे घालायचे नसतील तर तुम्ही लाँग ड्रेसवर बेल्ट वापरू शकता. बाजारात विविध पद्धतीचे स्टायलिश बेल्ट मिळतात.
  • डेनिम जीन्स एव्हरग्रीन आहे. विशेष करून जर तुमच्याकडे निळ्या जीन्स आणि काळ्या जीन्सची जोडी असेल तर तुमच्या जवळजवळ सर्व फॅशन समस्या सुटतील.

हेही वाचा – लिप बाममुळे ओठ गुलाबी नव्हे पडतील काळे; एकदा हे वाचा

  • स्ट्रेट फिट कुर्ती तुमच्याकडे असावली हवी. साध्या पारंपरिक लूकसाठी हा उत्तम पर्याय आहे.
  • मॅक्सी ड्रेस वॉर्डरोबमध्ये असायला हवा. तुम्हाला कॅज्युअल आणि सेमी-फॉर्मल प्रसंगी मॅक्सी ड्रेस घातला येईल.
  • टी-शर्ट, प्लेन टॉप, मॅक्सी ड्रेस, शॉर्ट ड्रेस आणि स्पेगेटी ड्रेसवर डेनिम जॅकेट घालता येते. त्यामुळे डेनिम जॅकेट खरेदी करा.
  • बाजारात जॅकेट स्टाइलपासून ते केप स्टाइलपर्यंत विविध प्रकारचे श्रग मिळतात. जे तुम्ही जीन्सपासून ते अगदी साडीवर घालू शकता.
  • ऑफिससाठी परफेक्ट लूक हवा असेल तर कलरफूल ट्राउझर्स तुमच्याकडे असायला हव्यात. या ट्राउझर्ससोबत तुम्ही शर्ट, टॉप, कुर्ती घालू शकता.

हेही वाचा – Facial Tips : घरच्या घरी फेशियल करणाच्या सोप्या स्टेप्स

Comments are closed.