World Smile Day का साजरा होतो?

निरोगी आरोग्यासाठी अन्न, पाणी, व्यायाम यासह खळूखळून हसणं महत्वाचं आहे. पण, आजकालच्या धावपळीच्या आणि स्ट्रेसफुल रुटीनमध्ये कित्येकजण हसणचं विसरून गेले आहेत. त्यामुळे डॉक्टरही कायम आपल्याला हसत राहा, हसल्याने आयुष्य वाढते असे सांगत राहतात. गोड स्माइल द्या नाहीतर खळूखळून जोरात हसा, कसंही हसा पण हसा. आज वर्ल्ड स्माईल डे साजरा होत आहे. यानिमित्त्ताने जाणून घेऊयात या दिनाचे इतिहास आणि हसण्याचे फायदे

इतिहास

दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘जागतिक स्मितहास्य दिवस’ म्हणजेच ‘वर्ल्ड स्माइल डे’ साजरा केला जातो. विविध स्त्रोतावरून मिळालेल्या माहितीनुसार 1963 मध्ये वॉर्सेस्टरच्या मँसाचुसेट्स येथील एका ग्राफिक्स आर्टिस्ट हार्वे बॉल याने एका ग्राहकाचे काम करताना स्माईली फेस इमोजी तयार केला होता. त्यानंतर त्याने 1999 मध्ये ‘वर्ल्ड स्माइल डे’ साजरा करण्यास सुरुवात झाली. यंदा आज म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी ‘वर्ल्ड स्माइल डे’ साजरा होत आहे.

का होतो साजरा?

जागतिक स्माईल डेचा उद्देश लोकांना हसण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या जीवनात आनंद आणणे हा आहे. कारण या सध्याच्या बिझी लाईफस्टाइलमध्ये बहुतेक लोक तणावपूर्ण जीवन जगत आहेत. या दिनानिमित्त त्यांना हसण्याचे मोल कळू शकेल.

हेही वाचा – सोशल मीडियावर मुलांचे, कुटुंबाचे फोटो शेअर करणाऱ्यांनो जरा थांबा; पोलिसांनी दिलाय गंभीर इशारा

फायदे –

  • हसल्याने स्ट्रेस कमी होतो. स्ट्रेस कमी झाल्याने शरीराला आराम मिळतो आणि मन शांत होते.
  • हसल्याने हृदयाचा व्यायाम होतो. रक्तप्रवाह देखील सुरळीत होतो, जे हृदयासाठी फायदेशीर आहे.
  • हसल्याने अतिरिक्त ऑक्सिजन निर्माण होतो. या ऑक्सिजनमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
  • दररोज सकाळी हास्य ध्यान केल्याने दिवसभर फ्रेश वाटते.
  • रात्री झोपताना तु्म्ही हास्य ध्यान केलेत तर रात्री शांत झोप लागते.
  • हास्य योगामुळे शरीरात अनेक प्रकारच्या हार्मोन्सचा स्त्राव होतो, ज्यामुळे डायबिटीस, पाठदुखीपासून आराम मिळतो.
  • हसल्याने पोटाचे स्नायू ऍक्टिव्ह होतात, ज्यामुळे पचनसंस्था सुरळीत होते.
  • तुमच्या खळखळून हसण्याने आजुबाजूचे हसतील आणि वातावरण हास्यमय होईल. अशा वातावरणात सर्वत्र सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
  • हसल्याने मनोबल आणि आत्मविश्वास वाढतो. ज्यामुळे मानसिक स्थिती सुधारते. त्यामुळे दररोज न चुकता निरोगी आरोग्यासाठी एक स्माइल द्यायला विसरू नका.

हेही वाचा – Viral Video: तुम्ही जे बोलता ते इंस्टाग्राम खरंच ऐकते का? सीईओंनीच सांगितले सत्य

Comments are closed.