IND vs WI: ध्रुव जुरेलची शानदार कामगिरी! पहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावत भारतीय सैन्याला केलं समर्पित
भारत आणि वेस्ट इंडिजच्या (IND vs WI) 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यादरम्यान भारतीय विकेटकीपर-फलंदाज ध्रुव जुरेलने (Dhruv jurel) कमाल कामगिरी केली. त्याने उत्कृष्ट फलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा सामना केला. दुसऱ्या दिवशी भारताच्या फलंदाजी विभागाची जबाबदारी जुरेलने सांभाळली आणि संघासाठी महत्वाचा वाटा उचलला. जुरेलच्या शतकी पारीमुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. शतक पूर्ण केल्यानंतर जुरेलने फौजी स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले.
ध्रुव जुरेलने वेस्ट इंडिजविरुद्ध संयमाने आणि दमदार फलंदाजी केली. त्याने भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये आपले पहिले शतक झळकवले. ऋषभ पंतच्या (Rishbh Pant) अनुपस्थितीत त्याला संधी मिळाली होती आणि त्याने सिद्ध केले की, संधी मिळाल्यास तो नेहमीच भारतासाठी उत्तम कामगिरी करण्यास तयार आहे. त्याने आपले शतक 190 चेंडूत पूर्ण केले. शतकानंतर त्याने भारतीय लष्कराप्रमाणे बॅट बंदूकसारखी धरून सेलिब्रेशन केले, जे प्रेक्षकांना खूप आवडले.
जुरेलने 210 चेंडूत 125 धावा केल्या, ज्यात 15 चौकार आणि 3 षट्ककांचा समावेश होता. त्याचे पहिले शतक खूपच संस्मरणीय ठरले. जुरेलसोबतच केएल राहुलनेही (KL Rahul) शतकीय पारी खेळली, त्याने 197 चेंडूत 100 धावा केल्या.
भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वालने (Yashsvi jaiswal) 54 चेंडूत 36 धावा केल्या. केएल राहुलने 197 चेंडूत 100 धावा केल्या, तर कर्णधार शुबमन गिलनेही (Shubman gill) अर्धशतक केले. दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी आपला जलवा दाखवला. वेस्ट इंडिजने पहिल्यांदा 162 धावा केल्या होत्या, त्याच्या प्रतिसादात भारताने 124.3 षटकांमध्ये 5 विकेट गमावून 433 धावा केल्या. भारतीय संघ सध्या पहिल्या डावानंतर 274 धावांच्या आघाडीवर आहे.
Comments are closed.