विराट-रोहित ऑस्ट्रेलिया ODI मालिकेत मैदानावर दिसण्याची शक्यता, टीम इंडियाची घोषणा होणार ‘या’ दिवशी!

विराट कोहली आणि रोहित शर्माच्या (Virat Kohli & Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत येण्याबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. रिपोर्टनुसार रोहित आणि विराट या महिन्यातच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेमध्ये परत येऊ शकतात.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी BCCI 4 ऑक्टोबरला संघाची घोषणा करू शकते. विराट आणि रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर कुठलाही सामना खेळलेला नाही, त्यामुळे त्यांना या वनडे मालिकेत समाविष्ट करण्याची शक्यता जवळजवळ ठरली आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली, दोघांनीही 2024 टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टी20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्यांनी कसोटी क्रिकेटमधून देखील निवृत्ती घेतली. त्यांच्या निवृत्ती नंतर टी20 संघाच कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे गेलं आहे. तर शुबमन गिल नवीन कसोटी कर्णधार बनला आहे.

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाचा दौरा 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरपर्यंत असेल. यामध्ये प्रथम 3 सामन्यांची वनडे मालिका होईल, ज्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील खेळताना दिसू शकतात. त्यानंतर 5 टी20 सामन्यांची मालिका होईल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत रोहित शर्मा कर्णधार म्हणून काम करेल, तर विराट कोहलीचा संघात समावेश निश्चित आहे. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत खेळणार नाहीत. गेल्या काही आठवड्यांपासून असा अंदाज लावला जात होता की, ऑस्ट्रेलियन दौऱ्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माला संघातून विश्रांती दिली जाऊ शकते. सध्या ह्या फक्त अफवा आहेत, पण काही निवड समितीच्या सदस्यांचा असा विश्वास आहे की, रोहित आणि विराट 2027 वर्ल्ड कपपर्यंत संघात राहू नयेत. या विषयावर लवकरच चर्चा होऊ शकते.

Comments are closed.