स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत परिपूर्ण मतदारयादी वापरा, ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी


स्थानिक संस्था निवडणुका: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी परिपूर्ण मतदारयादी वापरण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 ची केंद्रीय निवडणूक आयोगाची विधानसभा निवडणुकांसाठीची मतदार यादी आधारभूत धरून त्याप्रमाणे निवडणुका आयोजित करण्याचे घोषित केले आहे.

कायदेशीररित्या परिपूर्ण नसलेली यादी वापरण्यास ठाकरे गटाचा विरोध

विधानसभा निवडणूक 2024 नंतर 1 जुलै 2025 या कालावधीत राज्यातील वाढलेल्या मतदार यादीबाबत कुठलेही आक्षेप अथवा सूचना राजकीय पक्षांकडून तसेच नागरिकांकडून केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे मागवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कायदेशीररित्या परिपूर्ण नसलेली ही मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत वापरण्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार, शिवसेना नेते आणि सचिव श्री अनिल देसाई यांनी तीव्र विरोध दर्शवून सदर यादीच्या शुद्धीकरणाबाबत राजकीय पक्षांना प्रारूप छापील मतदार यादी उपलब्ध करून तसेच नागरिकांसाठी वर्तमानपत्र, सोशल मीडिया तसेच दूरचित्रवाणी इत्यादींवर जाहिरात करून त्याद्वारे सूचना व आक्षेप मागवून मतदार यादी परिपूर्ण केल्यानंतरच ही मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत करण्यात यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष मा. राज्य निवडणूक आयुक्त श्री दिनेश वाघमारे यांना भेटून करण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ईव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचा वापर करणेबाबतही चर्चा

एक जुलै 2025 या आधारभूत तारखेनंतर वाढलेल्या मतदारांना मतदान प्रक्रियेत समाविष्ट करणेबाबत व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ईव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचा वापर करणेबाबतही चर्चा या बैठकीत करण्यात आली. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या सर्व आक्षेपांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन या शिष्टमंडळास दिले.सदर बैठकीस राज्य निवडणूक आयोगाचे अतिरिक्त आयुक्त श्री सुरेश काकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपसचिव श्री प्रवीण महाले, उपसचिव श्री सचिन परसनाईक व श्री दिनेश बोभाटे उपस्थित होते. मतदार यादी परिपूर्ण केल्यानंतरच ही मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत करण्यात यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष मा. राज्य निवडणूक आयुक्त श्री दिनेश वाघमारे यांच्याकडे करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या:

Bachchu Kadu: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅट नको, तर मग निवडणूक कशाला हव्यात? भाजप कार्यालयातच शिक्का मारा; बच्चू कडूंचा ‘प्रहार’

आणखी वाचा

Comments are closed.