… आम्ही नकाशावर पाकिस्तान पुसून टाकू!

भारत आता संयम बाळगणार नसल्याचा लष्करप्रमुखांचा इशारा : लष्करी जवानांना सज्ज राहण्याचा सल्ला

वृत्तसंस्था/ अनुपगड

राजस्थानमधील अनुपगडमध्ये भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर 1.0’मध्ये संयम दाखवला होता. मात्र, यापुढील ‘ऑपरेशन 2.0’मध्ये संयम बाळगणार नाही असे स्पष्ट करतानाच पाकिस्तानला नकाशावरून (भूगोल) पुसून टाकू असे सुनावले आहे. जागतिक नकाशावार राहायचे आहे की नाही याचा पुनर्विचार पाकिस्तानला करावा लागेल. जर नकाशावर राहायचे असेल तर त्यांना दहशतवाद थांबवावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. विजयादशमीच्या निमित्ताने लष्करप्रमुखांनी  सैनिकांना संबोधित करताना हा इशारा दिला आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या एका दिवसानंतर लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनीही पाकिस्तानला हा उघड इशारा दिला. जनरल द्विवेदी यांनी शुक्रवारी शेजारी देशाला इशारा देताना पुढील ‘ऑपरेशन’मध्ये भारत संयम बाळगणार नसल्याचे सांगितले. आम्ही अशी कारवाई करू की पाकिस्तानचा नकाशा बदलेल. पाकिस्तानला इतिहास आणि भूगोलात राहायचे आहे का याचा विचार करावा लागेल. जर पाकिस्तानला आपला भूगोल बदलायचा नसेल तर दहशतवादाचा नायनाट करावाच लागेल, असे रोखठोकपणे सांगितले.

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी राजस्थानमधील नई मंडी घडसानाच्या 22 एमडी गावातील सीमावर्ती भागाला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी लष्कर आणि बीएसएफ अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर सैनिकांना मार्गदर्शन केले. ऑपरेशन सिंदूर 1.0 मध्ये नऊ पाकिस्तानी दहशतवादी अ•s उद्ध्वस्त करण्यात आले. 100 सैनिक आणि अनेक दहशतवादी मारले गेले. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे श्रेय लष्कर आणि स्थानिक लोकांना जाते. ऑपरेशन सिंदूर आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत ते आपल्यासोबत राहील, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. त्याचदरम्यान त्यांनी बीएसएफच्या 140 व्या बटालियनचे कमांडंट प्रभाकर सिंग, राजपुताना रायफल्सचे मेजर रितेश कुमार आणि हवालदार मोहित गेरा यांना ऑपरेशन सिंदूरमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित केले.

सैनिकांना सज्ज राहण्याच्या सूचना

जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारतीय सैनिकांना तयार आणि सज्ज राहण्याचे निर्देश दिले. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच राहिल्या तर भारताला पाकिस्तानविरोधात लढण्याची लवकरच आणखी एक संधी मिळू शकते. त्यामुळे ‘कृपया पूर्णपणे तयार रहा. देवाची इच्छा असेल तर ही संधी लवकरच येईल. देवाच्या कृपेने, तुम्हाला लवकरच आणखी एक संधी मिळेल’, असे आर्जव लष्करप्रमुखांनी सैनिकांना केले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने अचूक हल्ले करत पीओके आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अ•s उद्ध्वस्त केले. भविष्यातील प्रत्युत्तर मात्र यापेक्षाही शक्तिशाली असेल असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

आम्ही पूर्णपणे तयार…

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने जगाला पाकिस्तानमधील नष्ट केलेल्या दहशतवाद्यांच्या अ•dयांचे पुरावे दिले. जर आम्ही पुरावे दाखवले नसते तर पाकिस्तानने ते लपवले असते. आता भारत त्यापेक्षाही अधिक क्षमतेने पूर्णपणे तयार आहे. आता आम्ही ऑपरेशन सिंदूर 1.0 चा संयम बाळगणार नाही. भारत अशी कारवाई करेल की पाकिस्तानला इतिहास आणि भूगोलात टिकून राहायचे आहे की नाही याचा पुनर्विचार करावा लागेल. जर त्याला इतिहासात आपले स्थान टिकवून ठेवायचे असेल तर त्याला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे लागेल, असे लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला सूचित केले.

संरक्षणमंत्र्यांनीही सुनावले पाकिस्तानला खडे बोल

दसऱ्याच्या निमित्ताने गुरुवारी गुजरात दौऱ्यावर असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कच्छ जिह्यातील भुज येथे सैनिकांना संबोधित केले. सर क्रीकच्या बाजूच्या भागात पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांचा अलिकडच्या काळात झालेला विस्तार त्याचे हेतू प्रतिबिंबित करतो. सर क्रीक प्रदेशात पाकिस्तानने केलेल्या कोणत्याही धाडसाला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल जे इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलेल, असे संरक्षणमंत्र्यांनी येथे म्हटले होते.

………

Comments are closed.