15 वेळा शून्यावर बाद झाला तरी 16व्यांदा खेळशील…, सूर्यकुमार यादवने 'या' खेळाडूवर दाखवला मोठा विश्वास

भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा एक अनोखा गुण समोर आला आहे. युवा भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने खुलासा केला की कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्यावर इतका विश्वास ठेवला की तो चांगली कामगिरी करू शकला. अभिषेकने स्पष्ट केले की भारतीय संघासाठी त्याची सुरुवातीची कामगिरी चांगली नव्हती, परंतु कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला आत्मविश्वास दिला.

अभिषेक शर्माचे नाव सध्या क्रिकेट चाहत्यांच्या ओठांवर आहे. अभिषेकने त्याच्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. त्याने आशिया कप 2025मध्ये एक संस्मरणीय कामगिरी केली आणि त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. डावखुरा फलंदाज या स्पर्धेत 314 धावा काढल्या.

अभिषेक शर्मा निश्चितच यशाच्या मार्गावर आहे, परंतु 25 वर्षीय या खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवात सातत्यपूर्ण राहिलेली नाही. त्याने गेल्या वर्षी झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केले होते. सुरुवातीला अभिषेक मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. त्याचे स्थानही धोक्यात होते.

मग कर्णधार सूर्यकुमार यादवने तरुण फलंदाजावर विश्वास निर्माण केला आणि म्हणाला, “तू 15 वेळा शून्यावर बाद झालास तरी मी तुला 16व्यांदा अंतिम इलेव्हनमध्ये संधी देईन.” अभिषेकच्या मते, कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाला त्याची क्षमता कळली होती आणि तो संघाला एक मजबूत सुरुवात देईल.

ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्समध्ये गौरव कपूरशी बोलताना अभिषेक शर्मा म्हणाला, “जेव्हा मला भारतीय संघात निवडण्यात आले तेव्हा मी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत 3-4 वेळा लवकर बाद झालो. त्यावेळी सूर्याने मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली: ‘तू माझ्यासाठी इतका महत्त्वाचा खेळाडू आहेस की तू 15 वेळा शून्यावर बाद झालास तरी तू पुढचा सामना खेळशील. मी तुला हे लेखी स्वरूपात देऊ शकतो.’ मी विचारले, ‘तुला विश्वास आहे का पाजी?’

तो पुढे म्हणाला, “ही खूप मोठी गोष्ट होती की संघाच्या कर्णधाराने मला सांगितले की मी कितीही वेळा बाद झालो तरी मी खेळेन.” मला एक गोष्ट स्पष्ट झाली आहे: जर मला चांगले प्रदर्शन करायचे असेल आणि स्वतःचे नाव कमवायचे असेल, तर मला काहीतरी वेगळे करावे लागेल.”

अभिषेक शर्माला आशिया कप 2025 मध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले. तो आयसीसी पुरुष टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत नंबर 1 झाला. ज्यात त्याने सर्वाधक 931 रेटींग्स मिळवल्या.

Comments are closed.