26 ऑक्टोबरपासून थेट भारत-चीन उड्डाणे

इंडिगो एअरलाईन्सची कोलकाता-ग्वांगझू फेरी सुरू होणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान पाच वर्षांपूर्वी रद्द करण्यात आलेली भारत-चीन थेट विमानसेवा येत्या 26 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. या सेवेतील पहिले विमान कोलकातामधून ते ग्वांगझू येथे रवाना होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि चीन दरम्यान थेट उ•ाणे पुन्हा सुरू करण्यासाठी करार झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एका प्रेस रिलीजमध्ये याची घोषणा केली. त्यानंतर इंडिगो एअरलाईन्सने 26 ऑक्टोबरपासून दोन्ही देशांमधील थेट उ•ाणे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. कोविड-19 साथीच्या आजारापासून भारतीय आणि चिनी नागरिक थायलंड, सिंगापूर किंवा मलेशिया सारख्या त्रयस्थ देशांमधून प्रवास करत असल्यामुळे यात वेळ आणि खर्च दोन्ही वाढला होता. आता थेट विमानसेवेमुळे आर्थिक आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. तसेच द्विपक्षीय संबंध सुधारण्यालाही हातभार लागणार आहे.

कोलकाता ते ग्वांगझू या फेरीसाठी इंडिगो एअरलाईन्स एअरबस ए320निओ ही विमाने वापरणार आहे. इंडिगो पाठोपाठ लवकरच एअर इंडियाची विमानेही भारत-चीन फेरीमध्ये दाखल होती. या वर्षाच्या अखेरीस भारत आणि चीन दरम्यान थेट उ•ाणे पुन्हा सुरू करण्याचे संकेत एअर इंडियाने दिले आहेत.  कोविड-19 साथीच्या आजारामुळे 2020 मध्ये ही सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर, गलवान संघर्षामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडल्यानंतर हा सेवेला पूर्णपणे ब्रेक लागला होता.

द्विपक्षीय संबंधांना लाभ

थेट विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे भारतीय आणि चिनी व्यापारी, विद्यार्थी, पर्यटक आणि कुटुंबे एकमेकांच्या देशांमध्ये सहज प्रवास करू शकतील. यामुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध मजबूत होतील. तसेच व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळेल. त्याव्यतिरिक्त हा निर्णय दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी आणि संबंध सामान्य करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल असल्याचे मानले जात आहे.

…………

Comments are closed.