भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! सामना कधी, कुठे, कसा पाहाल; फुकटात पाहण्यासाठी काय करायचं?
भारत विरुद्ध पाकिस्तान महिला विश्वचषक 2025 थेट प्रवाह: आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारत नवव्यांदा किताब आपल्या नावावर केला. आता पुन्हा एकदा भारत–पाक सामना रंगणार आहे, पण यावेळी पुरुष नव्हे तर महिला संघ आमनेसामने भिडणार आहेत. महिला वनडे वर्ल्ड कपच्या सहाव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार असून हा सामना श्रीलंकेच्या कोलंबो येथे खेळवला जाणार आहे.
भारतीय महिला संघाचा विक्रम
वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघ पाकिस्तानकडून कधीही पराभूत झालेला नाही. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवरही टीम इंडिया हा इतिहास कायम ठेवण्याच्या निर्धारात आहे. वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 11 सामने झाले असून सर्वच सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. वर्ल्ड कपमध्ये भारत–पाक महिला संघ चार वेळा समोरासमोर आले आहेत आणि प्रत्येक वेळी विजयाचा झेंडा भारतीय महिला क्रिकेटपटूंनीच फडकावला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला एकदिवसीय वर्ल्ड कपमधील सहावा सामना कधी, किती वाजता, कुठे खेळवला जाईल? (When and Where to Watch Ind W vs Pak W)
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला एकदिवसीय वर्ल्ड कपमधील सहावा सामना रविवार, 5 ऑक्टोबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:00 वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी, दुपारी 2:30 वाजता होईल. हा सामना कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल.
भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप सामना कोणत्या टीव्ही चॅनेलद्वारे प्रसारित केला जाईल?
महिला वर्ल्ड कप प्रसारित करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या स्वतंत्र चॅनेल, स्टार स्पोर्ट्स 1/एचडी आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी/एचडी वर टीव्हीवर पाहू शकता, हिंदी आणि इंग्रजीमध्ये समालोचनासह होईल.
हा भारत-पाकिस्तान सामना कोणत्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल?
रविवार, 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग JIOHotstar अॅप किंवा वेबसाइटवर पाहता येईल.
भारत आणि पाकिस्तान अंतिम सामना कुठे मॅच फुकटात पाहायचा? (IND vs PAK free?)
भारत आणि पाकिस्तान सामन्याचा आनंद अगदी मोफत घेऊ शकता, यासाठी डीडी स्पोर्ट्स (DD Sports) वाहिनीवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण मोफत पाहता येईल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.