भारताविरुद्ध नको ते कृत्य करणारा हारिस रौफला संघातून डच्चू, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा मोठा नि


दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान कसोटी पथक: पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) 2025–27 चा एक भाग आहे. शान मसूद कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे, तर आसिफ आफ्रिदी, फैसल अख्तर आणि रोहेल नजीर या तीन नवख्या खेळाडूंना कसोटी संघात संधी देण्यात आली आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023–25 चे विजेते दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली कसोटी 12 ते 16 ऑक्टोबरदरम्यान लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर खेळवली जाईल. दुसरी कसोटी 20 ते 24 ऑक्टोबरदरम्यान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

आशिया कप 2025 मधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी ऑलराउंडर सॅम अयुब आणि वेगवान गोलंदाज हरिस रौफ यांना कसोटी संघातून बाहेरचा मार्ग दाखवण्यात आला आहे. वर्षाच्या सुरुवातीला टाचेला झालेल्या दुखापतीपूर्वी अयूब हा कसोटी संघाचा नियमित सदस्य होता, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी जाहीर झालेल्या 18 जणांच्या संघात त्याला स्थान मिळालेले नाही.

सॅम अयुबची कसोटी संघातून हकालपट्टी

आशिया कपमध्ये सॅम अयुबची फलंदाजी फारच निराशाजनक ठरली. त्याने खेळलेल्या 7 पैकी 4 सामन्यांत तो शून्यावर बाद झाला. भारताविरुद्धच्या सुपर-4 सामन्यातील 21 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली, मात्र संघाला त्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. तरीसुद्धा अयूबने गोलंदाजीत मात्र काही प्रमाणात भरपाई केली. त्याने स्पर्धेत एकूण 8 गडी बाद केले आणि गोलंदाजीत काटकसर दाखवली.

अयूबने शेवटचा कसोटी सामना नववर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यातील सातव्या षटकात त्याच्या टाचेला गंभीर दुखापत झाली होती आणि त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यायावे लागले होते. त्यानंतर तो चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही बाहेर होता. 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केलेल्या या डावखुऱ्या फलंदाजाने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्याने 26 च्या सरासरीने 364 धावा केल्या असून कसोटीत त्याच्या नावावर 4 बळीही आहेत.

भारताविरुद्ध नको ते कृत्य करणारा हारिस रौफला संघातून डच्चू

भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात हारिस रौफची गोलंदाजी पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरली. त्याने केवळ 50 धावा दिल्या आणि एकही गडी बाद करू शकला नाही. आणि हारिस रौफ आशिया कप 2025 मध्ये भारताविरुद्ध नको ते कृत्य करत होता. त्यामुळे निवड समितीने त्यालाही संघातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण आफ्रिका कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ (Pakistan Test Squad vs South Africa) –

शान मसूद (कर्णधार), अमीर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, आसिफ आफ्रिदी, बाबर आझम, फैसल अक्रम, हसन अली, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नोमान अली, रोहेल नजीर (यष्टीरक्षक), साजिद खान, सलमान अली आगा, सौद शकील आणि शाहीन शाह आफ्रिदी.

आणखी वाचा

Comments are closed.