अक्षय कुमारच्या फिटनेसचे रहस्य व्यायाम नव्हे ‘ही’ सवय, म्हणाला- मी रोज सकाळी..
बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार हा कायमच प्रेम, अफेअर, लग्न यामुळे चर्चेत राहिला. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. अक्षयचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्याचे कारण फिटनेस आहे. अक्षय कुमार हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. तो बॉलिवूडच्या सर्वात फिट अँड फाईन अभिनेत्यांपैकी एक आहे. एका कार्यक्रमात अक्षयने त्याच्या फिटनेसचे रहस्य सांगितले आहे. ( Akshay Kumar Fitness Routine )
नुकतेच एका कार्यक्रमात अक्षय कुमारने सांगितले की, त्याने आता वायाची ५८ वर्षे पूर्ण केली आहेत. तो म्हणाला, ”माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कधीही सूर्योदयाची वेळ चुकवली नाही. म्हणजेच मी रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठतो”. तो पुढे म्हणाला, ”माझे वडील नेहमी म्हणायचे की उशिरा झोपणारे लोक उल्लू
( घुबड ) असतात”.
अक्षय कुमार संध्याकाळी 7 वाजण्याआधी जेवण करतो. तो रात्री १० च्या आधी झोपतो आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळी उठतो. आठ तास काम आणि झोप घेण्याचा जसा नियम आहे तसे प्रत्यकाने दिवसातून दोन तास व्यायाम करावा असे अक्षय म्हणतो. याच कारणामुळे अनेकदा बॉलिवूडमधील पार्टी, अवॉर्ड फंक्शनमध्ये अक्षय कुमार सहभागी होत नाही.
अक्षयच्या फिटनेसचे रहस्य त्याची एक सवय आहे ती म्हणजे सकाळी सूर्योदय न चुकवण्याची. तुम्हाला प्रश्न पडला असेल की खरंच सकाळी लवकर उठल्याने शरीराला काय फायदा होतो? आपण ते जाणून घेऊया…
- तज्ञांच्या मते, अक्षय कुमारप्रमाणेच दररोज सूर्योदयाच्या वेळी उठल्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे शरीरात मेलाटोनिन नावाचा हार्मोन तयार होतो ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
- सकाळी लवकर उठल्याने व्हिटॅमिन डी ची निर्मिती होते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
- सकाळी सूर्योदयाच्या वेळी उठल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते, मूड चांगला राहतो, पचनक्रिया सुधारते.
- सकाळी १०-१५ मिनिटे कोवळ्या सूर्यप्रकाश बसने ही आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीसाठी चांगली सवय आहे.
Comments are closed.