पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते द्या, आता गरज आहे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना; उद्धव ठाकरे यांची मागणी

जसं निवडणुकीच्या आधी दोन-तीन महिन्यांचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले तसे पुढच्या सहा महिन्याचे हप्ते आता द्या ना, आता गरज आहे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पुण्यात अजित नागरी पतसंस्थेच्या महिला बचत गट कर्जदार महिला भगिनींना कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम आणि महिला भगिनींच्या वतीने कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला.

https://www.youtube.com/watch?v=Y579WCJPT2G

लोकशाहिची ही दुर्दैवी अवस्था आहे की, कोर्टात जाऊन न्याय मिळत पण हातात दांडूका मिळाल्यानंतर न्याय मिळतो हे तुम्ही आज सिद्ध करून दाखवलं. याआधी पत्रकार संघात संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची आपली केस सुरू आहे. आता आठ-दहा दिवसांत काहीतरी तारीख आहे. तर तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न मला तिथे विचारला. म्हटलं आता लवकरच २०४५-२०५० पर्यंत न्याय मिळेल, अशी आम्हाला आशा आहे. शेवटी दार ठोकून-ठोकून न्याय मिळणार नसेल तर लोकांनी करायचं काय? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

तुमच्या सारख्या माताभगिनी ज्यांचा कोणी वाली नाहीये. सगळे गडगंज संपत्ती लुटून परदेशात पळून गेले. हे कुठे पळणार पळून-पळून? शेतकरी आत्महत्या करतोय तो कुठे पळणार? कारण आपण सर्वसामान्य प्रामाणिक आहोत. एखादी बँक नोटीस लावते, जेव्हा शेतकऱ्याच्या घरावर नोटीस लागल्यानंतर तो म्हणते अशी बदनामी गावात होण्यापेक्षा जीव दिलेला बरा. तो देश सोडत नाही, तो देह सोडतो. हा फरक आहे. आणि मग कधीतरी सरकारच्या मनात येतं आणि त्यांचं करोडो रुपयांचं कर्ज हे सरकारकडून माफ करून टाकलं जातं. मग गोरगरिबांनी काय करायचं? जेव्हा कर्जामुळे तुमची बँक खाती गोठवली गेली आणि घराघरात कर्ज फेडता येत नाही म्हणून वाद-विवाद होत असतील ते टेन्शन तुम्ही कसं सहन करू शकलात? हे जोपर्यंत ज्यांनी तुम्हाला फसवलं होतं त्या नालायकाला भोगावं लागत तोपर्यंत ते संकट दूर नाही होणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

लडाखमध्ये वांगचुक यांची चूक असेल तर, मणिपूरमध्ये कोण चुकलं? मणिपूर का पेटलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला परखड सवाल

करा जनता दरबार सुरू, नाहीतर शिवसेनेचं जन्म घेण्याचं कारण काय आहे दुसरं? न्याय-हक्कासाठी लढणारी शिवसेना, सत्ता असो किंवा नसो. तुम्ही जर का ठरवलं तर सत्ता परत येईल. आज सत्ता नाहीये पण न्याय मिळवून दिला. त्याच्यासाठीच तर शिवसेना आहे. हा जो फरक आहे सत्ता असणारे कसे आहेत आणि सत्ता नसणारे कसे आहेत? तुमच्या मदतीला धावून कोण आलं? सत्ता नसलेले. आणि लाडक्या बहिणीचे लाभ कोणाला कोणाला कोणी दिले? लाडकी बहीण योजना जाहीर केली. मी तर असं म्हटलंय की, ज्या परिस्थितीत आज महाराष्ट्र आहे, मराठवाड्यातला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सगळीकडे वाताहत झालेली आहे. निवडणुकीच्या वेळेला दोन-तीन महिने पैसे तुमच्या खात्यात आले होते की नव्हते? त्याच्यानंतर तुम्हाला फोन यायचा. ताई तुम्ही अमूक अमूक बोलताय ना, तुमचं या बँकेत खातं आहे ना, मग तुमच्या खात्यात पैसे आले ना? मग ताई काय म्हणाची, अरे बापरे माझं नाव यांना माहिती, टेलिफोन नंबर माहिती, बँकेचं खातं यांना माहिती आहे. पण लक्षात ठेवा, आमच्या दादाने, आमच्या भाऊने हे सगळं केलेलं आहे. मग ताई घाबरायची, एवढं जर का लक्ष आहे मग मत नाही दिलं तर हा काय करेल? महिला म्हटल्यानंतर हा एवढी मदत करतोय तर याला फसवायचं कसं? पण तुम्ही त्याला नाही फसवलं आता तो तुम्हाला फसवतोय. आताच्या परिस्थितीमध्ये जसं निवडणुकीच्या आधी दोन-तीन महिन्यांचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले तसे पुढच्या सहा महिन्याचे हप्ते आता द्या ना, आता गरज आहे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना. पुढच्या सहा महिन्याचे द्या टाकून आणि हे होऊ शकतं. आज आपल्याकडे जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे म्हणून काहीतरी मधाचं बोट नक्की लावतील, मोदी येताहेत आता. काहीतरी नक्की जाहीर करतील. पण ते मधाचं बोट आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बिहारच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाही. पण बिहारच्या ७५ लाख महिलांच्या खात्यात मोदीजींनी प्रत्येकी १०-१० हजार रुपये टाकलेले आहेत. मग महाराष्ट्राच्या बहिणी कमी लाडक्या आहेत का? बिहारच्या बहिणी जास्त लाडक्या आहेत का? का आता बिहारच्या बहिणींच्या मताची तुम्हाला आवश्यकता आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावरती जास्त प्रेम करताय का? असे निवडणूक बघून तुम्ही कशाला करताय, संपूर्ण देशातल्या महिलांना दर महिन्याला तुम्ही द्या. पण अट एक आहे की, तुम्ही देताहेत हे उपकार करत नाहीये हे यांच्या हक्काचे आहेत. महिलांना दर महिन्याला तुम्ही २१०० रुपये देणार होते, कधी देणार आहेत? २१०० रुपयांचा पत्ताच नाही. कारण दीड-दीड हजार देतानाच वांदे होणार असतील आणि तरीसुद्धा कधीतरी देत असतील तर या माझ्या बहिणी आहेत, तुमच्या पगारी मतदार नव्हेत. त्यांना त्यांचं मत स्वातंत्र्य आहे. त्यांना पाहिजे तिकडे ते मत देऊ शकतात.

शिवसेनाप्रमुखांनी सांगितलंय ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण. आणि जेव्हा समाज ठरवतो तेव्हा कोणाचाही माज तो उतरवू शकतो ही ताकद समाजाची असते. आणि जिथे-जिथे ज्यावेळेला आम्ही मदत करू शकतो ती पूर्ण ताकद आपण सगळ्या शिवसैनिकांनी या सगळ्यांच्या मागे उभी करून यांना कधीही रडू द्यायचं नाही. लाडक्या बहिणी आहेत कधीही रडू द्यायचं नाही. त्यांच्या आयुष्यात नेहमी आनंद फुलवण्याचा प्रयत्न करायचा.

Comments are closed.