Ind vs WI: हे 5 खेळाडू ठरले खरे हिरो! वेस्ट इंडिजला हरवून भारताने मिळवला ऐतिहासिक विजय

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन टेस्ट सामन्यांची मालिका खेळली जात आहे.(A two-Test series is being played between India and the West Indies)

पहिला सामना भारताने आपल्या नावावर केला. भारतीय संघाने डाव आणि 140 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडिया मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. भारताकडून पाच खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली.

सलामीवीर केएल राहुलने 100 धावांची खेळी केली. त्याचप्रमाणे ध्रुव जुरेलनेही 125 धावांचे योगदान दिले. तर रवींद्र जडेजाच्या बॅटमधून 104 धावा निघाल्या. गोलंदाजी विभागात मोहम्मद सिराजने शानदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 3 बळी घेतले. तसेच शुबमन गिलनेही 50 धावांची खेळी केली. दुसरा सामना 10 ते 14 ऑक्टोबरदरम्यान दिल्लीमध्ये खेळला जाणार आहे.

Comments are closed.