Ind vs Aus रोहित शर्माला धक्का, एक दिवसीय टीमचे नेतृत्व शुभमन गिलकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एक दिवसीय व T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा आज करण्यात आली. या दौऱ्यासाठी संघात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. एक दिवसीय संघाचे कर्णधार पद हे रोहित शर्माकडून काढून घेत शुभमन गिलकडे देण्यात आले आहे. तर उपकर्णधारपद श्रेयस अय्यर कडे देण्यात आले आहे.
जसप्रीत बुमराहला विश्रांती
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियात सध्या हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि प्रसिध कृष्णा यांना स्थान देण्यात आले आहे.
एकदिवसीय मालिकेचा संघ
शुबमन गिल (कर्नाधर), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (यूपी -करनाधर), अक्षर पटेल, केएल राहुल (युश्तार रक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुगार ध्रुव जुरले, यशसवी जसवाल
टी-२० चा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उप कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश कुमार (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टीरक्,क), रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर
Comments are closed.