पाकिस्तानने लाज सोडली! मोहसिन नक्वीच्या 'त्या' वागणुकीसाठी मिळणार मेडल
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना झाला, ज्यामध्ये टीम इंडियाने 5 विकेट्सनी विजय मिळवला. या विजयासोबत भारताने आशिया कपचा टायटल 9 वेळा जिंकला. पण तरीही टीम इंडियाला आशिया कपची ट्रॉफी मिळाली नाही. भारताने पाकिस्तान सरकारमधील मंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे चेअरपर्सन मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
आशिया कप प्रेझेंटेशन सेरेमनी दरम्यान ही गोष्ट समोर आली होती की आशियाई क्रिकेट काउन्सिल (ACC) कडून भारताला ट्रॉफी देण्यासाठी दुसरा अधिकारी येईल. पण मोहसिन नकवी त्यांच्या निर्णयावरती ठाम राहिले आणि टीम इंडियाला आशिया कप जिंकल्यानंतरही ट्रॉफी मिळाली नाही. द इंडिपेंडेंटच्या अहवालानुसार, आता यासाठी पीसीबी मोहसिन नकवीला गोल्ड मेडल देत आहे.
आशिया कप फाइनलमध्ये भारतविरुद्ध मोहसिन नकवीच्या या लज्जास्पद वागणुकीसाठी त्यांना गोल्ड मेडल दिले जाणार आहे. द इंडिपेंडेंटच्या अहवालानुसार, मोहसिन नकवीला शहीद जुल्फिकार अली भुट्टो एक्सीलन्स गोल्ड मेडल दिला जाईल. सिंध आणि कराची बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नकवीला हा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. त्यांचे मत आहे की पीसीबी चेअरपर्सन मोहसिन नकवीने भारताला आशिया कपची ट्रॉफी न देता पाकिस्तानचा सन्मान वाढवला आहे.
अहवालात असेही सांगितले गेले आहे की मोहसिन नकवीला हे मेडल देण्यासाठी कराचीत एक समारंभ आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात बिलावल भुट्टो जरदारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात येणार आहे.
आशिया कप 2025 मध्ये संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हातही मिळवला नाही. तसेच आशिया कपचे टायटल जिंकल्यानंतर टीम इंडियाने भारताविरुद्ध बोलणाऱ्या मोहसिन नकवीकडून ट्रॉफी घेण्यासही नकार दिला. भारतीय टीम ट्रॉफी मिळण्याची वाट पाहत होती, पण मोहसिन नकवी यांनी आशिया कपची ट्रॉफी स्वतःची मालमत्ता समजून स्वतःसोबत नेली. बीसीसीआय नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ग्लोबल बॉडी मीट्सदरम्यान इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल (ICC) समोर मोहसिन नकवीविरुद्ध तक्रार करणार आहे.
Comments are closed.