जसप्रीत बुमराहपासून हार्दिक पांड्यापर्यंत, या 5 खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी संघात स्थान नाही! जाणून घ्या सविस्तर
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 19 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने टीम इंडियाचं स्क्वॉड जाहीर केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माची (Rohit Sharma) जागा शुबमन गिलने (Shubman gill) घेऊन त्याला संघाचा नवीन कर्णधार बनवण्यात आले आहे. मात्र, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah & Hardik pandya) आणि हार्दिक पांड्यासह पाच स्टार खेळाडूंना टीममध्ये जागा मिळाली नाही.
जसप्रीत बुमराहला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. बुमराह टी20 स्क्वॉडमध्ये आहे, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे संघात त्याला समाविष्ट केले गेले नाही. हार्दिक पांड्या मात्र जखमेच्या कारणाने टीमबाहेर आहे. आशिया कप 2025 मध्ये फायनल सामन्यापूर्वी पांड्या जखमी झाला होता, त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये खेळू शकला नाही आणि आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही टीमसोबत जाणार नाही.
भारताचा दहशतजनक गोलंदाज वरुण चक्रवर्ती (Varun chakrawarthy & Sanju Samson) आणि स्टार फलंदाज संजू सॅमसन ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 स्क्वॉडमध्ये आहे, पण वनडे मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही. वरुण चक्रवर्ती आणि सॅमसन आशिया कपमध्येही भारताच्या टी20 टीममध्ये होते, पण वनडे टीममध्ये आपली जागा निर्माण करू शकले नाहीत.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसुद्धा (Mohmmed Shami) ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या वनडे मालिकेसाठी निवडला गेला नाही. भारताने शेवटचा वनडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळला होता आणि त्या वेळी शमी टीम इंडियाचा भाग होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्येही शमी खेळाडूंच्या मुख्य संघाचा भाग होता, पण आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला टीमबाहेर ठेवण्यात आले आहे.
Comments are closed.