साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 05 ऑक्टोबर 2025 ते शनिवार 11 ऑक्टोबर 2025
>> नीलिमा प्राचार्य
मेष – प्रकृतीची काळजी घ्या
मेषेच्या षष्ठेशात शुक्र, चंद्र बुध प्रतियुती. प्रकृतीची काळजी घ्या. भावनेच्या भरात व्यवहार केल्यास चूक होईल. कुणालाही कमी लेखू नका. नोकरीत दगदग होईल. धंद्यात चातुर्याने काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात शत्रुत्व वाढेल. चांगला दिवस 8, 11
वृषभ – शब्द जपून वापरा
वृषभेच्या पंचमेषात शुक्र, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. थट्टामस्करी करताना, चर्चेत शब्द जपून वापरा. तणाव जाणवेल. नोकरीमध्ये कामामध्ये अचानक बदल होईल. धंद्यात वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचे कौतुक होईल. चांगला दिवस 5, 11
मिथुन – महत्त्वाची कामे करा
मिथुनेच्या सुखेषात शुक्र, चंद्र बुध प्रतियुती. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. चर्चेत यश मिळेल. प्रगतीची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज निर्माण केले जातील. दूरदृष्टिकोन ठेवा. नम्रता बाळगा. चांगला दिवस 5, 8
कर्क – प्रवासात घाई नको
कर्केच्या पराक्रमात शुक्र, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. तुमच्या कामात यश मिळेल. चांगली संधी प्राप्त होईल. नोकरीत कौतुक होईल. धंद्यात कठोर शब्द नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या बाजूने बोलले जाईल. प्रवासात घाई नको. चांगला दिवस 8, 9
सिंह – परदेशी जाण्याची संधी
सिंहेच्या धनेषात शुक्र, चंद्र बुध प्रतियुती. किचकट कामे लवकर करा. परदेशी जाण्याची संधी मिळेल. नोकरीत प्रभाव राहील. नविन परिचय होतील. धंद्यात जम बसेल. कर्जवसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ज्ञानात भर पडेल. चांगला दिवस 11, 8
कन्या – कामात यश मिळेल
स्वराशीत शुक्र, चंद्र बुध प्रतियुती. अडचणींवर मात करून समस्या सोडवाल. उत्साहात भर पडेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. नोकरीत वर्चस्व. धंद्यात नवे धोरण वापराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे मान्य होतील. चांगला दिवस 6, 11
तूळ – अहंकार दूर ठेवा
तुळेच्या व्ययेषात शुक्र, चुद्र गुरू लाभयोग. मनाविरुद्ध कामे करावी लागतील. प्रतिष्ठा जपा. प्रकृतीची काळजी घ्या. महत्त्वाच्या वस्तू जपा. नोकरी टिकवा. धंद्यात हिशेब तपासा. अहंकार दूर ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा अपमान होईल. चांगला दिवस 5, 8
वृश्चिक – रागावर ताबा ठेवा
वृश्चिकेच्या एकादशात शुक्र, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. बोलताना काळजी घ्या. मतभेद टाळा. रागावर ताबा ठेवा. नोकरीत काम वाढेल. धंद्यात समतोल राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परखड बोला. विरोधकांना कमी लेखू नका. चांगला दिवस 10, 11
धनु – प्रत्येक दिवस महत्त्वाचा
धनुच्या दशमेषात शुक्र, चंद्र, बुध प्रतियुती. महत्त्वाची कामे करून घ्या. व्यावहारिक प्रश्न रेंगाळत ठेवू नका. प्रत्येक दिवस महत्त्वाचा. नोकरीत कठीण कामात यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेच यशस्वी ठरतील. चांगला दिवस 5. 8
मकर – कार्याला गती मिळेल
मकरेच्या भाग्येषात शुक्र, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. अडचणी कमी होतील. महत्त्वाची कामे करा. मेहनत घ्या. शत्रुत्व वाढू देऊ नका. नोकरीत यश मिळेल. धंद्यातील गुंता सोडवा. दिग्गज व्यक्तींचे सहकार्य मिळेल. कार्याला गती मिळेल. चांगला दिवस 5, 10
कुंभ – निर्णयात घाई नको
कुंभेच्या अष्टमेषात शुक्र, चंद्र बुध प्रतियुती. क्षुल्लक कारणाने मनाची द्विधा अवस्था होईल. निर्णयात घाई नको. कायदा पाळा. आत्मविश्वास प्राप्त होईल. नोकरीत सहनशिलता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अडचणी वाढतील. चांगला दिवस 8, 9
मीन – प्रवासात सावध रहा
मीनेच्या सप्तमेषात शुक्र, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस उत्साहवर्धक. प्रवासात सावध रहा. वाद वाढवू नका. गोड बोला. धंद्यात वाढ होईल. थोरामोठय़ांच्या मदतीने कामे मिळतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य शब्द वापरा. चांगला दिवस 8, 9
Comments are closed.