दिवाळीनंतर दोनच दिवसांत निवडणूक आचारसंहिता; मंत्री पाटलांच्या भविष्यवाणीने उंचावल्या राजकीय भुवया
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. दिवाळीनंतर दोनच दिवसांत निवडणूक आचारसंहिता जाहीर होईल, असा अंदाज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा, विधानसभेपेक्षा नेत्यांची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका असते. लोकशाहीमधील सर्वांत महत्त्वाची ही निवडणूक आहे. दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला लागा. येणाऱया दिवाळीचा फायदा करून घ्या. लोकांना भेटून संपर्क वाढवा, असा कानमंत्र चंद्रकांत पाटील यांनी मेळाव्यात बोलताना दिला.
2019 साली ज्यांचे तिकिट नाकारले. त्या बावनकुळे यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार मिळाले. निवडणूक ही फास्ट ट्रेनप्रमाणे आहे. प्लॅट फॉर्मवर जो राहील तो राहील, मात्र नाराज होऊ नका. राजकारणात प्रयत्नाबरोबरच नशीबदेखील लागते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
लोकसभा-विधानसभा निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये नेत्यांची खरी कसोटी असते. लोकशाहीत ही सर्वांत महत्त्वाची निवडणूक आहे. कदाचित आज (दि. 4) संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होईल, असा अंदाज व्यक्त करीत, ‘आता निवडणूक आयोगाशी दादांची चर्चा झाली वाटतं’, असं कोणीतरी म्हणेल; पण आपण 40 वर्षं यात घालविल्याने त्यानुसार अंदाज मांडल्याचे पाटील यांनी सांगितले.
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत
n स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे. मात्र, शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतील. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. अजित पवार गट आणि शिंदे गट मागत असलेल्या जागेवर भाजपकडे चांगला उमेदवार असेल तर मैत्रीत लढू; पण कार्यकर्त्यांचा बळी दिला जाणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.