Diwali DIY Decoration Ideas: यंदाच्या दिवाळीत टाकाऊ वस्तूंपासून बनवा टिकाऊ डेकोरेशन

दिवाळी आता अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच प्रत्येकाच्या घरी दिवाळीची जय्यत तयारी सुरू झाली असेल. यंदाच्या दिवाळीला बाजारातील सजावटीचे सामान वापरण्यापेक्षा घरच्या घरी टाकाऊ वस्तूंपासून तुम्ही आकर्षक असे डेकोरेशनच्या वस्तू बनवू शकता. अगदी घरी उपल्बध असणारे वर्तमानपत्र, कार्डबोर्ड, काचेच्या बाटल्या वापरून या वस्तू तयार होतात.

कागदी कंदील
बाजारात मिळणारे आकाशदिवे हे महाग असतात. मग त्यापेक्षा घरी क्राफ्ट पेपर, वर्तमानपत्रे, मासिके वापरून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आकाशदिवे तयार करू शकता. या आकाशदिव्यांना पेंट करून बाल्कनीत किंवा टेरेसवर लावू शकता. तसेच घरात लावण्यासाठी छोट्या आकाराचे आकाशकंदीलही तुम्ही बनवू शकता.

काचेच्या बाटल्यांचे दिवे
कोल्ड्रिंक किंवा सॉसच्या रिकाम्या बाटल्या अनेकदा घरात असतात. त्या फेकून देण्याऐवजी तुम्ही जार लाईट तयार करू शकता. म्हणजेच या बाटल्या पेंट करून नंतर त्यात सोलार स्ट्रिंग लाईट्स ठेवावे. बाटलीवर पारंपरिक ओम किंवा स्वस्तिकची चिन्हही काढू शकता. हे दिवे खिडक्या, टेबल किंवा बागेत ठेवावे.

वृत्तपत्राचे तोरण
घराचे दार सजावल्याशिवाय दिवाळीची सजावट अपूर्ण असते. दारासाठी तुम्ही न्यूज पेपरचे तोरण बनवू शकता. पाने, फुले, दिवे अशा विविध आकारात पेपर कापून रंग द्या. यानंतर एखादी आकर्षक लेस वापरून हे तोरण जोडू शकता. हे तोरण तुम्ही तुमच्या दारावर लावल्यास अनोखा लूक येईल.

पुठ्ठ्याची रांगोळी
घरी अनेकदा मोठ्या प्रमाणात पुठ्ठा असतो. त्याचा वापर तुम्ही यंदाच्या दिवाळीला करू शकता. पुठ्ठयाला विविध आकारात कापून रंग द्या. हे पुठ्ठयाचे आकार जमिनीवर ठेवा आणि त्यावर तांदूळ किंवा डाळ ठेवा, ज्यामुळे ते हवेने उडणार नाही. यामुळे तुमची रांगोळी आणखी आकर्षक दिसेल.

Comments are closed.