एजंटने केली 50 हजारात खरेदी; वाड्यात जबरदस्तीने बालविवाह, विकृत पतीसह सहा जणांवर गुन्हे

पालकांना दमदाटी करून काही दलालांनी ५० हजारांच्या बालविवाह संगमनेरच्या सावर गावातील जीवन गाडे याच्याबरोबर लावून दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या पती व एका एजंटसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक ठिकाणी बालविवाह केले जातात. वाडा तालुक्यातही दलालांनी एका १४ वर्षांच्या मुलीला ५० हजार रुपयांना विकत घेऊन संगमनेर येथील जीवन गाडे याच्याबरोबर लग्न लावून दिले आहे. मात्र ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर पती व तिच्या सासरच्या मंडळींनी तिचा किरकोळ कारणावरून छळ करण्यास सुरुवात केली.

तुला विकत आणले आहे अशी दमदाटी तिला केली जात होती. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात पती जीवन, चुलत सासरे अमोल गाडे, सासरे बाळासाहेब गाडे, सासू, नातेवाईक महिला तसेच दलाल रवी कोर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी कागद रंगवले

पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर बनावट आधारकार्ड तयार करुन खोटी जन्मतारीख टाकण्यात आली. बुधावली कातकरवाडीत आणखी चार मुलींची अशाच पध्दतीने लग्न लावल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव, सुरेश रेंजड, भरत जाधव, सूरज दळवी यांनी केला असून त्याची चौकशी करण्याची मागणी त्याने केली आहे.

Comments are closed.