वनडे मॅचमध्ये ट्रिपल सेंच्युरी, 35 षट्कारांसह 314 धावांचा डोंगर; ऑस्ट्रेलियाच्या हरजसची खेळी


एकदिवसीय सामन्यात हर्जस सिंग ट्रिपल शतक: वनडे क्रिकेटमध्ये (ODI Cricket) सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करण्याचा धमाकेदार विक्रम सध्या रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आहे, त्यानं श्रीलंकेविरुद्ध 264 धावा केलेल्या. अशातच आता ऑस्ट्रेलियाच्या हरजस सिंहनं 50 ओव्हर्सच्या सामन्यात एक नाही, दोन नाही तर तब्बल तीन शकतं झळकावून खळबळ उडवून दिली आहे. हरजसनं न्यू साउथ वेल्स प्रीमियर क्रिकेट स्पर्धेत 314 धावांची धमाकेदार खेळी खेळली. 141 चेंडूंच्या या खेळीत त्यानं  35 षटकारही ठोकले, ज्यात त्यानं तब्बल 210 धावांची खेळी केवळ षटकांच्या जोरावर रचली.

फक्त 20 वर्षीय हरजस सिंहनं शनिवारी दुसऱ्या फेरीच्या सामन्यात वेस्टर्न सबर्ब्सकडून खेळताना सिडनीविरुद्ध शानदार त्रिशतक झळकावलं. निकोलस कटलर आणि जोशुआ क्लार्क यांच्यात 70 धावांची भागीदार झाली. त्यानंतर हरजस सिंह तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. हरजस सिंहनं सुरुवातीला सावध फलंदाजी केली. तो मैदानावर आला, थोडासा स्थिरस्थावर झाला आणि त्यानंतर मात्र त्यानं दुसरीकडे कुठेच पाहिलं नाही. अक्षरशः गोलंदाजाच्या तोंडाला फेस येईपर्यंत हरजसनं मैदानावर षट्कार आणि चौकारांचा पाऊस पाडला.

हरजस सिंहनं 33 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, त्याचा वेग काहीसा मंदावला पण, काही वेळातच स्वतःला सावरत त्यानं केवळ 74 चेंडूंमध्ये आपली शतकी खेळी पूर्ण केली. पण त्यानंतर, मात्र रुद्रावतार घेतल्याप्रमाणे हरजस येईल त्या गोलंदाजावर बरसताना दिसला. हरजसचं वादळ काही थांबण्याचं नाव घेत नव्हतं.

फक्त चौकार, षटकारांच्या जोरावर 258 धावा

हरजस सिंहनं 314 धावांच्या खेळीत 35 षटकार आणि 12 चौकार मारलेत, त्यात 210 षटकार आणि 48 चौकारांचा समावेश होता. याचा अर्थ त्याने 258 धावा फक्त चौकारांच्या मदतीने केल्या. त्याने त्याचे पहिले शतक 74 चेंडू खेळले, परंतु त्याचे दुसरे शतक फक्त 29 चेंडूत आले. हरजसने 132 धावांवर आपले त्रिशतक पूर्ण केले, शेवटच्या षटकात 314 धावांवर बाद होण्यापूर्वी. हरजसच्या धमाकेदार खेळीमुळे वेस्टर्न सबर्ब्सने 483 धावांचा मोठा धावसंख्या उभारला.

हरजस सिंहनं ऑस्ट्रेलियासाठी खेळलाय अंडर 19 विश्वचषक

हरजस 2024 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता, त्यानं भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात 55 धावा केल्या. त्रिशतक झळकावल्यानंतर हरजस सिंह म्हणाला की, “मी फक्त शतक झळकावण्यात आनंदी होतो, कारण मी माझ्या आईला विचारलेलं , ‘जर मी या सामन्यात शतक झळकावलं तर तू मला तुझी गाडी चालवू देशशील का?”

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर 1

सर्वाधिक वैयक्तिक एकदिवसीय खेळीचा विक्रम अजूनही रोहित शर्माच्या नावावर आहे, ज्यानं 13 नोव्हेंबर 2014 रोजी श्रीलंकेविरुद्ध 264 धावा केल्या. 173 चेंडू चाललेल्या या खेळीत रोहितनं 9 षटकार आणि 33 चौकार मारले. रोहित शर्मा आता फक्त वनडे खेळतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहलीसोबत त्याची संघात निवड झाली आहे. पण कर्णधार पदाची धुरा मात्र शुभमन गिलवरच देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

‘जबरदस्तीनं धर्मांतर…’, पाकिस्तानी क्रिकेटपटूला हवंय भारतीय नागरिकत्व? म्हणाला, ‘भारत मेरी मातृभूमी…’

आणखी वाचा

Comments are closed.