बेंचखाली कॉपी आढळली, मुख्याध्यापिकेकडून विद्यार्थिनीचा अपमान, दहावीच्या मुलीचं टोकाचं पाऊल; धक्


नवी मुंबई गुन्हा: ऐरोलीतील सुशिलाबाई देशमुख विद्यालयात दहावीत शिकणारी अनुष्का शहाजी केवळे या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. परीक्षेदरम्यान कॉपीसंदर्भात शाळेतील मुख्याध्यापिका देशमुख मॅडम यांनी सार्वजनिकपणे केलेल्या अपमानामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. अनुष्काच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात (Rabale Police Station) मुख्याध्यापिका देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी शाळेत परीक्षेचे पेपर सुरू असताना अनुष्काच्या बेंचखाली कॉपीची एक चिठ्ठी आढळून आली. यावरून मुख्याध्यापिकांनी तिला सर्व विद्यार्थ्यांसमोर अपशब्द वापरत अपमानित केले, असे पालकांचे म्हणणे आहे. या प्रकाराने मानसिक तणावात गेलेल्या अनुष्काने घरी आल्यानंतर आत्महत्या केली.

मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल

या घटनेची गंभीर दखल घेत रबाळे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका देशमुख मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थी व पालक वर्गात संतापाची लाट उसळली असून मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

Mumbai Crime News : आरे कॉलनीत तरुणीवर बलात्कार

दरम्यान, आरे कॉलनी परिसरात एका 22 वर्षीय व्यावसायिक नृत्यांगनेवर बलात्कार केल्याची गंभीर घटना समोर आली असून, याप्रकरणी आरे पोलिसांनी नृत्य प्रशिक्षक व कार्यक्रम आयोजक असलेल्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पीडिता ही अंधेरी परिसरात वास्तव्यास असून, स्टेज शो आणि चित्रपटांमध्ये डान्सर म्हणून काम करते. काही महिन्यांपूर्वी एका डान्स इव्हेंटमध्ये तिची आरोपीसोबत ओळख झाली. त्यानंतर त्याने तिला अधिक काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला कामाच्या निमित्ताने एका ठिकाणी बोलावून तिच्यावर जबरदस्ती केली, असा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर आरे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई केली.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: बदला तो फिक्स! आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रिल्स अपलोड करणे पडले महागात, पोलिसांकडून दाखवला चांगलाच इंगा

Ramdas Kadam on Anil Parab : अनिल परब भाXXX, उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी खोटं बोलला, मी कोर्टात जाणार; रामदास कदमांचा थेट इशारा

आणखी वाचा

Comments are closed.